f
computer

हे आहेत बिग बॉसच्या घरातले १५ स्पर्धक : दिवस आहेत शंभर, यांनी कसलीय कंबर !!

बिग बॉस मराठीत येणार म्हटल्यावर अनेक प्रश्न मनात आले. होस्टिंग कोण करणार, स्पर्धक कोण असणार, वगैरे वगैरे ? त्यापैकी होस्टिंग कोण करणार हे फार काळ सिक्रेट नाही राहिलं. मराठीतले मुरब्बी कलाकार महेश मांजरेकर मराठी बिग बॉसचं होस्टिंग करणार आहेत. आता राहता राहिला प्रश्न स्पर्धकांचा. तो प्रश्नही मिटला आहे.

आज पाहूयात मराठी बिग बॉस मध्ये कोण कोण दिसणार आहे ते !!

१. उषा नाडकर्णी

आपल्या लाडक्या आऊ बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालणार आहेत. सुनेचा छळ कसा करावा आणि सासू म्हणजे काय याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे ‘उषा नाडकर्णी’. मराठी बरोबरच हिंदी मध्ये देखील त्यांनी आपली छाप सोडली आहे.

२. रेश्मा टिपणीस

शाहरुखच्या 'बाजीगर' मध्ये रेश्मा टिपणीस दिसली होती. चित्रपटांपेक्षा ती ‘डेली सोप’ मध्ये जास्त दिसून आली आहे.

३. पुष्कर जोग

पुष्कर जोग हल्ली चित्रपटांमध्ये दिसत नाही. पण एकेकाळी त्याने बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचा महेश कोठारे दिग्दर्शित ‘जबरदस्त’ सिनेमा त्याकाळी गाजला होता.

४. भूषण कडू

कॉमेडीयन म्हणून भूषण कडू अनेकांना माहित असेल. नाटक, सिनेमे, मालिकांमधून तो दिसला आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातली त्याची धम्माल अजूनही लोक विसरलेले नाहीत.

५. स्मिता गोंदकर

‘पप्पी दे पारू ला’ या सुपरहिट गाण्यातील पारू म्हणजे स्मिता गोंदकर.

६. विनीत भोंडे

विनीत भोंडेचं ‘चला हवा येउद्या’ मधून थेट ‘मराठी बिग बॉस’ मध्ये पदार्पण झालेलं आहे भौ.

७. राजेश शृंगारपुरे

राजेश शृंगारपुरे आजवर अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याचा ‘डॅडी’ सिनेमातला रोल लक्षात राहिला होता.

८. ऋतुजा धर्माधिकारी

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील सुसल्या आठवते का ? तीच ती ऋतुजा धर्माधिकारी. आता बिग बॉसच्या घरात कोणता नवा खेळ मांडणार ती ?

९. आरती सोळंकी

‘पोरी जपून दांडा धर’ या गाण्यातील पोरगी म्हणजे आरती सोळंकी. ती सुद्धा बिग बॉसच्या घरात असणार आहे.

१०. मेघा धाडे

मेघा तिच्या मालिकांमधल्या रोल्ससाठी ओळखली जाते. डीडी नॅशनलवर असलेली ‘पेहचान’ मालिकेमुळे ती ओळखली जाऊ लागली.

११. सुशांत शेलार

दुनियादारी मधला ‘हमे सस्ती चीजो का शौक नही’ म्हणणारा मेहुणा आठवला का ? तोच सुशांत शेलार भाऊ. बिग बॉसच्या घरात काय राडा घालतोय ते बघावं लागेल.

१२. अनिल थत्ते

अनिल थत्ते पत्रकार आणि ज्योतिष आहेत.

१३. सई लोकूर

कपिल शर्मा बरोबर सईने ‘किस किसको प्यार करूँ’ सिनेमा केला होता. त्याऐवजी ती आणखी काही सिनेमांमध्ये दिसली आहे.

१४. आस्ताद काळे आणि जुई गडकरी

‘पुढचं पाऊल’ मालिकेत या दोघांची केमिस्ट्री दिसली होती. आता ते बिग बॉसच्या घरात काय करतात ते बघूया.

 

तर, या १५ जणांना घेऊन बिग बॉसचं घर सज्ज झालं आहे. दिवस आहेत शंभर, यांनी कसलीय कंबर !!

सबस्क्राईब करा

* indicates required