६५ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : नागराज मंजुळे, श्रीदेवी, ए.आर. रहमान...कोणाकोणाला पुरस्कार मिळालेत पहा बरं !!

६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी असलेले ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेले अनेक उत्कृष्ट सिनेमे यावेळी स्पर्धेत होते. मराठीसाठी हे वर्ष म्हणावं तसं उत्साहवर्धक नव्हतं. असं असलं तरी 'कच्चा लिंबू', 'लपाछपी', 'नदी वाहते' असे एकशे एक सिनेमे २०१७ मध्ये येऊन गेले. यातील कच्चा लिंबूने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.

‘न्यूटन’ हा ठळकपणे यावर्षीचा दमदार बॉलीवूड सिनेमा होता. त्याच बरोबर 'ट्रॅप्ड', 'नाम शबाना', 'कडवी हवा', 'मॉन्सून शूटआउट', या सिनेमांमध्ये वेगळेपण होतं. या सर्व एकापेक्षा एक वरचढ सिनेमांमधून पुरस्कारांवर कोणी बाजी मारली आहे ते बघूया !!

६५ व्या राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी खालील प्रमाणे :

मराठी सिनेमा :

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू

स्रोत

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) - पावसाचा निबंध - नागराज मंजुळे

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – म्होरक्या

नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - ठप्पा - निपुण धर्माधिकारी

स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) - म्होरक्या - यशराज कऱ्हाडे

सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग

सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) - मयत - सुयश शिंदे

सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा- राजेंद्र जंगले

 

हिंदी सिनेमा :

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन

स्रोत

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण - वॉटर बेबी - पिया शाह

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - दिव्या दत्ता (इरादा)

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर-  ए.आर. रहमान (मॉम)

सर्वोत्कृष्ट गाणं - ए.आर. रहमान

सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं - अब्बास अली मोगल (बाहुबली 2)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - बाहुबली 2

स्रोत

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार - टॉयलेट एक प्रेम कथा)

स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) - हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा

स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) - अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)

सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रप - नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग

सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती - गिरीजादेवी डॉक्युमेंट्री

सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट - द गर्ल्स वी वर अँड द वुमन वी आर

दादासाहेब फाळके पुरस्कार – विनोद खन्ना

 

आणखी वाचा :

सैराट नंतर 'नागराज मंजुळे' घेऊन येत आहे नवीन शॉर्ट फिल्म....टीझर बघितला का ?

सबस्क्राईब करा

* indicates required