व्हायरल गोष्टी : सगळ्यांना चाय पाजणाऱ्या या आंटी आहेत तरी कोण ?

 

 

राव, इंटरनेटवर व्हायरल होण्याची वेळ आता एका आंटीवर आलेली आहे. ह्या आंटीला सगळे ‘चाय पिलो फ्रांड्स’वाली आंटी म्हणून ओळखतात. तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर हा व्हिडीओ बघाच राव.

या आंटी प्रेमाने तिच्या ‘फ्रांड्स’ना चहा प्या म्हणत आहेत. या साध्यासुध्या व्हिडीओने सोशल मिडिया गाजवलाय राव. इतकंच काय, हा व्हिडीओ जगभर फिरतोय. पण व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या आंटी आहेत तरी कोण माहित आहे का ?

या आंटी आहेत सोमवती महान्वार. सोमवती यांनी ‘वीगो व्हिडीओ अॅप’ वरून आपला जेमतेम १५ सेकंदांचा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मिडीयावर शेअर केला. या व्हिडीओनंतर त्यांचे असे आणखी काही व्हिडीओ आले. हे व्हिडीओ ढिंच्याक पूजासारखे डोकेदुखी वाढवणारे नसले तरी तुफान विनोदी होते. आता अशा व्हिडीओने व्हायरल व्हावं यात नवल काय.

आणि मग काय, सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस पडू लागला. राव, सोमवती यांनी ४०० व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत ज्यातले काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

मंडळी, त्यांचे बाकीचे व्हिडीओ सुद्धा पाहून घ्या.

 

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required