अमिताभ तात्यांच्या जाहिरातीवर का भडकलेत बँकवाले ?? वाचा यापूर्वीही काय घोळ घातला होता या लोकांनी !!

मंडळी, आपले अमिताभ तात्या इतक्या उत्पादनांच्या जाहिराती करतात, की त्यांनी कशाची जाहिरात अजून केली नाही, असा प्रश्न पडतो. पण काही ब्रँड्सच्या जाहिराती ते नियमितपणे करतातच करतात. कल्याण ज्वेलर्सहा त्यातला एक. यांच्यासाठी तर ते सहकुटूंब-सहपरिवार जाहिरात करत असतात.

या कल्याण ज्वेलर्सची एक नवी जाहिरात आलीय आणि तिच्यामुळे बँकांमधले लोक बच्चनकाकांवर जामच चिडलेत. असं काय आहे काय त्या ऍडमध्ये ?

तर बघाच हा व्हिडीओ-

मंडळी, टिपिकल ऑफिस आणि तिथले तुसडे कर्मचारी. या कर्मचाऱ्यांना ग्राहकांची अजिब्बात काळजी नाही. ते ग्राहकांना फुटबॉल सारखं इकडून तिकडे पळवतात. हे वातावरण बघून तुम्हाला ८०-९० च्या दशकातील सिनेमा आठवला का ?

या गोष्टीतील ऑफिसच्या जागी बँक टाका, त्यात एक म्हातारा माणूस आणि त्याची मुलगी दाखवा, थोडीशी इमानदारीचा मसाला टाका आणि गरिबीची फोडणी द्या...झालं, तयार झाली बिग बीची फर्स्टक्लास जाहिरात.

स्रोत

या अॅड फिल्म मधली गोष्ट म्हणजे अगदीच टिपिकल आहे राव. बरं एवढं सगळं करून शेवट पर्यंत कळत नाही की कल्याण ज्वेलर्सचा आणि या जाहिरातीचा काय संबंध. मग शेवटी एक वाक्य येतं “भरोसा ही सब कुछ है..” आणि आपली ट्यूब पेटते.

एक विशेष गोष्ट तर सांगायची राहूनच गेली. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता पहिल्यांदाच अभिनय करताना दिसत आहे. जाहिरातीत अमिताभ तात्यांबरोबर ‘दर दर की ठोकरे’ खाणारी मुलगी तीच की हो.....

स्रोत

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने (All India Bank Officers’ Confederation) बँक कर्मचाऱ्यांचं चुकीचं चित्रण केल्या प्रकरणी कल्याण ज्वेलर्सवर कायदेशीर कार्यवाही करणार असं सांगितलंय. यावर कल्याण ज्वेलर्सवाले म्हणाले की आमची जाहिरात म्हणजे ‘काल्पनिक कथा आहे’.

राव काहीही म्हणा पण अमिताभ तात्यांनी आता भरमसाठ जाहिराती करणं बंद करावं. काही आठवड्यापूर्वी त्यांनी हॉरलिक्सची जाहिरात केली होती. तेव्हा अमिताभ तात्यांना लोकांनी भरमसाठ सल्ले दिले होते. हे तर काहीच नाही राव, त्यांच्या ‘विरुद्ध’ या सिनेमात तर अर्ध्या जाहिरातीच होत्या.

कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीवर लोकांनी आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही बरं...यापूर्वीही बच्चन तात्यांची सूनबाई राणीसारखी बसलीय आणि तिच्या डोक्यावर एक काळा गुलाम मुलगा छत्र घेऊन उभा आहे अशी त्यांनी जाहिरात केली होती. तेव्हा तर लोक इतके चिडले होते की कल्याण ज्वेलर्सवाल्यांनी लोकांची माफी मागून जाहिरात मागे घेतली होती.

स्रोत

 

आणखी वाचा :

बच्चन काकांच्या 'हॉरलिक्स' विकण्यावर हे आहेत लोकांचे आक्षेप !!

सबस्क्राईब करा

* indicates required