computer

या प्रश्नांची ही उत्तरं देऊन भारतीय सौंदर्यवतींनी पटकावला मिस वर्ल्डचा किताब...

जागतिक स्तरावर आयोजित करण्यात येणारी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा आतापर्यंत ६ भारतीय युवतींनी जिंकलीय मंडळी. अर्थातच आपल्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. जगभरातील युवतींसोबत स्पर्धा करून, अनेक फेर्‍यांना सामोरं जाऊन ही स्पर्धा जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. स्पर्धेत फक्त युवतींच्या सौंदर्याचीच नव्हे, तर व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंची पारख केली जाते. यामध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रश्नोत्तरांच्या फेरीत विचारलेला एक प्रश्न स्पर्धकांच्या आत्मविश्वासाचा, वैचारिक प्रगल्भतेचा कस पाहून तिचं भविष्य ठरवत असतो. आज आपण पाहूया स्पर्धेतल्या प्रश्नोत्तरांच्या फेरीत भारतीय सौंदर्यवतींनी दिलेली काही आदर्श उत्तरं.. या उत्तरांनीच त्यांना मिस वर्ल्डचा किताब मिळवून दिला...

रिता फारिया, मिस वर्ल्ड (१९६६)

प्रश्न : तुम्हाला डॉक्टर का बनायचंय?

उत्तर : भारतात स्त्री विशेषज्ञांची फार गरज आहे. भारतात लहान मुलं खूप आहेत आणि यावर काम करण्याची आवश्यकता आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन, मिस वर्ल्ड (१९९४)

प्रश्न : मिस वर्ल्ड १९९४ मध्ये कोणते गुण असायला हवेत?

उत्तर : आतापर्यंत झालेली प्रत्येक मिस वर्ल्डकडे दया, करूणा आहे हे त्या प्रमाणित करत होत्या. त्यांची ही करूणा वंचिंतांप्रती आहे. आपल्याजवळ असे अनेक लोक आहेत जे लोकांनी बनवलेल्या राष्ट्रीयता आणि वर्णांच्या भिंती पार करून जगाकडे पाहू शकतात. आम्हालाही या भेदांपलिकडे जाऊन पहायला हवं. हाच गुण बनवू शकतो एक खरी मिस वर्ल्ड, एक खरा माणूस... एक वास्तविक माणूस.

डायना हेडन, मिस वर्ल्ड (१९९७)

प्रश्न : जर तुम्हाला या जगातलं कोणीही बनता आलं, तर तुम्ही कोण बनाल?

उत्तर : मी अॉड्री हेपबर्न (ब्रिटिश अभिनेत्री) बनेन. त्यांच्यात झळकणारा करूणाभाव, आंतरीक सौंदर्य, शांत वृत्ती आणि तेजस्वीतेचा मी आदर करते.

युक्ता मुखी, मिस वर्ल्ड (१९९९)

प्रश्न : एक महत्त्वाचा सल्ला जो एक मुलगी म्हणून तुम्ही तुमच्या माता-पित्यांना देऊ इच्छिता, तो काय असेल व का?

उत्तर : मी माझ्या माता-पित्यांना सांगेन, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही शिकवलेलं प्रत्येक तत्व घेऊन मी तुमच्यासोबत उभी आहे. आणि मला आशा आहे की आम्ही जगासमोर उदाहरण उभं करू की, पाहा...  आमचे कौटुंबिक आदर्श आणि नैतिकता काय आहे.

प्रियांका चोप्रा, मिस वर्ल्ड (२०००)

प्रश्न : तुमच्या मते आज जिवंत असणारी सर्वात यशस्वी महिला कोण आहे? आणि का?

उत्तर : अशा खूप महिला आहेत ज्यांचा मी सन्मान करते. त्यांच्या सिध्दांतांवर विश्वास ठेवते. पण सगळ्यात प्रशंसनीय आहेत त्या मदर तेरेसा. त्या विचारशील, करूणामयी आणि दयाळू आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्याचा त्याग करून लोकांचं आयुष्य सुंदर बनवल्याबद्दल, त्यांच्या चेहर्‍यावर स्मित आणल्याबद्दल मी त्यांचा हृदयपूर्वक आदर करते. (खरंतर मदर तेरेसा यांचं निधन १९९७  सालीच झालं होतं. पण तरीही प्रियांकाने ही स्पर्धा जिकंली.) 

मानुषी छिल्लर, मिस वर्ल्ड (२०१७)

प्रश्न : तुमच्या मतानुसार कोणत्या प्रोफेशनसाठी सर्वाधिक वेतन दिलं पाहिजे? आणि का?

उत्तर : माझ्या आईसोबत माझी खूप जवळिक आहे. त्यामुळे माझ्या मते सगळ्यात जास्त सन्मान आईला मिळाला पाहीजे. इथे वेतनाचा विचार न करता प्रेम आणि आदर द्यायला हवा. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी माझी आई सर्वात मोठी प्रेरणा आहे. सगळ्याच माता आपल्या मुलांसाठी खुप मोठा त्याग करतात. त्यामुळे माताच सर्वाधिक वेतन, प्रेम आणि आदरासाठी प्राप्त ठरतात.

तर मंडळी, यातलं कोणतं उत्तर तुम्हाला तुम्हाला जास्त आवडलं? कमेन्ट बॉक्समध्ये नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required