आशुतोष गोवारीकर साकारणार आहेत 'पानिपत'....वाचा चित्रपटाबद्दल महत्वाची माहिती !!

आपला मराठी माणूस आशुतोष गोवारीकर हा बॉलीवूडच्या प्रमुख दिग्दर्शकांमध्ये गणला जातो. लगान, जोधा अकबर, आणि गेल्या वर्षी आलेला ‘मोहेंजो दारो’ हे त्यांचे सिनेमे तुम्ही पहिले असतीलच. गेल्या वर्षी आलेला मोहेंजो दारो हा बॉक्स ऑफिसवर सडकून आपटला. त्यांच्या लगानची जादू त्यांच्या पुढील चित्रपटांमध्ये दिसली नाही हे आजवर सिद्ध झालं आहे. आता त्यांच्या नवीन फिल्मची घोषणा झाली आहे. आणि यावेळी आपला हा मराठी माणूस आपल्या अस्सल मातीतली कथा सांगायला तयार झाला आहे. ही कथा आहे पानिपतच्या तिसऱ्या लढाईची. चित्रपटचं नाव असेल ‘पानिपत’.

स्रोत

चित्रपटात पहिल्यांदाच अर्जुन कपूर,  कृती सनोन आणि संजय दत्त एकत्र दिसणार आहेत. संजय दत्त हा अभिनयात उत्तम आहेच पण अर्जुन कपूरची आजवरची कामगिरी बघता त्याला का निवडलं हा भलामोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. या दोघांबरोबरच कृती सुद्धा एका महत्वाच्या भूमिकेत दिसेल. या तिघांची पात्र कोणती असतील याबद्दल कोणतीही बातमी तूर्तास तरी आलेली नाही. पोस्टर रिलीज करून चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. २०१८ च्या मध्यापर्यंत चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होईल आणि ६ डिसेंबर, २०१९ रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.

मराठा साम्राज्याचं पतन जिथून सुरु झालं आणि एक न पुसता येण्यासारखा डाग ज्यामुळे तयार झाला त्या ऐतिहासिक घटनेला आशुतोष गोवारीकर कोणत्या प्रकारे मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत हे पाहण्यासारखं असेल. लगानची तीच जादू पुन्हा अनुभवण्यास मिळाली तर हा चित्रपट अजरामर होईल. नाही तर जनतेला याबदल्यात ‘दुगना लगान देना पड़ेगा’.

सबस्क्राईब करा

* indicates required