computer

लोकमान्य टिळक ते संजय दत्त : बॉलिवूडचा मेकअप जादूगार, एकच नाव आपला मराठी छावा 'विक्रम गायकवाड'

मंडळी, चित्रपट क्षेत्रातील एक आव्हानात्मक काम म्हणजे ‘रंगभूषा’ . चित्रपटातील पात्र जेव्हा लेखकाच्या हातून घडवली जातात तेव्हा त्यांना खरं रूप देण्यात काम रंगभूषाकार बजावत असतो. अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला स्क्रिप्टच्या मागणीनुसार हुबेहूब तयार करण्याचं काम रंगभूषाकार करत असतो.

स्रोत

मंडळी आज रंगभूषाकाराबद्दल लिहिण्यामागचं कारण म्हणजे कालच संजू रिलीज झाला. संजू मधला रणबीरच्या अभियानाला समर्थ साथ दिली आहे ती रंगभूषेने. ही रंगभूषा साकारण्याचं शिवधनुष्य पेलणारे विक्रम गायकवाड यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

स्रोत

विक्रम गायकवाड यांनी तब्बल ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. त्यांच्याबद्दल काही सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या चित्रपटांची यादी बघा.

 

रंग दे बसंती

थ्री इडियट्स

भाग मिल्खा भाग

डर्टी पिक्चर

पिके

दंगल

इंदू सरकार

तेरे बिन लादेन

परी (केशभूषा)

दिल्ली-६

 

मराठी चित्रपट

बालगंधर्व

लोकमान्य : एक युगपुरुष

कट्यार काळजात घुसली

रेगे

इंदिरा (नाटक)

 

आगामी सिनेमे

भाई व्यक्ती की वल्ली

आणि काशिनाथ घाणेकर

मंडळी वरील चित्रपटांची यादी बघितली तरी धडकी भरते. यातील जवळजवळ सर्वच चित्रपट हे सुपरहिट ठरले होते. यात विक्रम गायकवाड यांचा सुद्धा वाटा आहे यात वादच नाही. पडद्यावरील कलाकार जेवढ्या मेहनतीने काम करतात तेवढ्याच मेहनतीने विक्रम गायकवाड हे पडद्यामागे काम करत असतात.

स्रोत

दक्षिणेच्या मामुटीला त्यांनी बाबसाहेब आंबेडकरांच्या रुपात उभं केलं तेव्हा खुद्द मामुटीला देखील स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नव्हता. सुबोध भावेला बालगंधर्वांच्या रुपात तयार करण्यापासून ते त्याच सुबोधला लोकमान्य टिळकांच्या रुपात तयार करण्यापर्यंत विक्रम गायकवाड यांची पराकोटीची मेहनत दिसून येते. सध्या गाजत असलेल्या संजूने तर त्यांच्या कलेला पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

मंडळी, अशा या मराठमोळ्या मेकअपच्या जादूगाराला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required