बोभाटाची दिवाळी जत्रा : काय असेल चंमतगच्या दिवाळी अंकात??

या वर्षी दिवाळी निमित्त पहिल्यांदाच सादर करत आहोत 'बोभाटाची दिवाळी जत्रा'. या जत्रेतील एक भन्नाट आकर्षण म्हणजे चंमतग दिवाळी अंक. चंमतग दिवाळी अंकात काय आहे? चला जाणून घेऊ!!

 

सर्वात आधी बघू 'चंमतग' मध्ये खास काय असेल ?

तर मंडळी, चंमतगमध्ये मा. बाळासाहेब ठाकरे यांची खणखणीत आणि दणदणीत एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेणार आहेत कट्टर साहेबराव. या मुलाखतीचा काही भाग पुढील प्रमाणे :

 

'बाळकडू'

मुलाखतकार : कट्टर साहेबराव, पनवेल

प्रश्न : अच्छा, म्हणजे तुमच्या पप्पांमुळे तुम्ही व्यंगचित्रकार बनलात तर?

बाळासाहेब : पप्पा नाही हो, आम्ही आमच्या वडलांना दादा म्हणायचो. ते चित्रकार होते. फोटोग्राफर होते. लेखक होते. चांगले वक्ते होते. इतकंच काय, त्यांनी सिनेमातसुद्धा अभिनय केला. आॅल इन वन होते ते. दादा आम्हाला नेहमी सांगायचे की, माणसाकडे हुनर असायला हवी. एखादी कला अंगी असायला हवी. अशी हुनर किंवा कला अंगी बाणवलेला माणूस कधी बेरोजगार राहणारच नाही. रोजगाराच्या संधी त्याच्यासाठी आपोआपच निर्माण होतात. 

प्रश्न : शाळेतल्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल?

बाळासाहेब : काय डोंबल्याचा सल्ला देणार मी..? पूर्वी मी शाळा-महाविद्यालयांच्या बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून जायचो. नंतर तेसुद्धा बंद केलं. आज तुम्ही छोट्यांच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने आलात म्हणून तुमच्याशी बोलतोय. २५ वर्षांपूर्वी तुमच्याच वयाचे नीता आणि आनंद तोरोसकर आले होते, ठकठक मासिकाच्या उद्घाटनासाठी. इथेच. या मातोश्रीत. आता तुम्ही मागितलाच आहे सल्ला, तर एक नाही तीन सल्ले देतो. पहिला सल्ला, वाचाल तर वाचाल. दुसरा सल्ला, कलेची उपासना तुम्हाला आनंद, प्रतिष्ठा आणि संपत्ती देऊ शकते. तिसरा सल्ला, अन्याय दिसेल तिथे लाथ मारायची. 

(उर्वरित भाग वाचा 'चंमतग' मध्ये !!)

 

चंमतग दिवाळी अंकातील खास मेजवानी पुढील प्रमाणे !!

चंमतग दिवाळी अंक

प्रकाशक : गजानन काळे (जनविकास प्रबोधिनी)
संपादक : किर्तीकुमार शिंदे (नवता बुक्सचे प्रकाशक आणि बोभाटाचे चांगले मित्र)
स्रोत

कार्यकारी संपादक : श्रीनिवास आगवणे (चित्रपतंग)
मुखपृष्ठ : आनंद तोरसकर

 

अं त रं ग
३ चित्रकथा : दिपू आणि पिंकी, टीना टीचर, विकतचा वेळ : वामनराव ननावरे आणि भरत व्यास

 

गोष्टी
गोलगोड गप्पा : राजीव तांबे
हॅलो मिस्टर बमचिक : रेणुका खोत
जोकर आणि दुतोंडी मासा : संस्कृती चोरगे (इयत्ता ४थी)
हॅप्पी बड्डे अब्बू : फारुक एस. काझी
झेन कथा : मुकेश माचकर

 

एक्स्क्लुझिव्ह मुलाखती
बाळासाहेब ठाकरे : कट्टर साहेबराव
शिनचॅन : ओंकार कारंडे

 

जोक्स 
हसा चकटफू : मुकेश माचकर (मामंजी)

कविता
एकनाथ आव्हाड
राजीव काळे
संजय शिंदे
ऋषिकेश जोशी
प्रभाकर खाडिलकर

 

लेख  
टच करके टच करके : निनाद सिद्धये
झकास बाॅडीचं टाॅप शिक्रेट : दत्ता गायकवाड
हॅप्पी अभ्यास : अमोल कडू

 

फोटोकथा
शाळेतलं भूत : चित्रा पतंगे

 

कलाशास्त्र
कातडं पांघरणारी अनोखी कला : डाॅ. संतोष गायकवाड
दिवाळी अंकाची निर्मिती कथा : हॅप्पी मॅगझिनवाला 
जे चित्र हसवतं ते हास्यचित्र : प्रशांत कुलकर्णी
नमस्ते लंडन :शर्वरी विद्वांस
घरच्या घरी फोटोग्राफी : कुणाल गोगरकर
मास्टरशेफ : यशोधन देशमुख
उबुंटू : विजय कलमकर
पैसा, म्हणजे काय रे भाऊ? : पुस्तकी किडा 

 

खेळ
त्रिकोण : राजीव तांबे
देवा, सहा पडू दे : नितीन चारी

Its different!
आम्ही एलएलबी : कमलेश देवरुखकर
वार्षिक राशीभविष्य : महामहोपाध्याय काणे गुरुजी

 

अंकासाठी संपर्क करा :

संपर्क : सुरेंद्र (नवता) 9324795050


© बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required