नव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का?

मनोज वाजपेयी, रणवीर शौरी, आशुतोष राणा आणि नव्या दमातील सुशांतसिंग राजपूत, भूमी पेडणेकर अशा चांगल्या कलाकारांना घेऊन तेवढ्यात चांगल्या दिग्दर्शकाने ‘सोनचिडिया’ तयार केला आहे. सिनेमाबद्दल बोलण्याआधी सिनेमाच्या पार्श्वभूमीबद्दल बोलूया.

स्रोत

चंबळचा डोंगराळ भाग हा नैसर्गिकरीत्या असा काही बनला आहे, की तिथे कोणी लपून बसलं तर सहज सापडणार नाही. याच भौगोलिक पोषकतेचा फायदा घेऊन चंबळ भागात डाकूंनी तळ ठोकला. या डाकूंचे किस्से आता दंतकथा बनल्या आहेत. याला हातभार लावला ते हिंदी सिनेमांनी. हिंदी सिनेमावरचा डाकूंचा प्रभाव काही केल्या कमी होत नाहीय. शोले हा डाकू सिरीज मधला अव्वल सिनेमा, मग त्यानंतर शोले छाप सिनेमाची रांगच लागली. याकालातले बरेच सिनेमे हिरवा मिलिटरी शर्ट, बंदुकीच्या गोळ्यांनी भरलेला कमरेचा अन समोर तिरपा बेल्ट आणि खांद्याला दुनळी रायफल अशा वेषातल्या डाकूंचे असायचे. ९० च्या दशकानंतर हा ओघ कमी झाला, तरी पुढे काही चांगल्या दिग्दर्शकांनी डाकूंच्या कथेला वेगळ्या पद्धतीने मांडलं. ‘बँडिट क्वीन’ हा त्यापैकीच एक. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आलेला इरफान खानचा ‘पान सिंग तोमर’ तितक्याच ताकदीचा सिनेमा होता. रामूचा नुकताच येऊन गेलेला ‘वीरप्पन’ मात्र फसला राव.

स्रोत

डाकूंच्या चांगल्या सिनेमांच्या यादीत आता आणखी एक नाव सामील होईल हे ‘सोनचिडिया’च्या टीझर वरून दिसत आहे. इश्किया, डेढ इष्कीया, उडता पंजाब या सारखे चांगले सिनेमे दिग्दर्शित केलेल्या अभिषेक चौबे’चा हा चौथा सिनेमा.

सिनेमा हाताळण्याची पद्धत अफलातून वाटत आहे. कलाकारांचे लूक इतके अस्सल आहेत, की आपल्याला टीझर पुन्हा पाहावा लागतो. याशिवाय भाषेवर केलेलं कामही लक्षात येण्याजोगं आहे. मनोज वाजपेयी हा कदाचित एकटा असा कलाकार असावा ज्याचा हा दुसरा डाकूंवर आधारित सिनेमा आहे. बाकी सुशांतसिंग राजपूतला सिक्सर मारण्याची पूर्ण संधी या सिनेमात आहे.

मंडळी, अशा सिनेमासाठी लागणारा अस्सलपणा ‘सोनचिडिया’ मध्ये पुरेपूर दिसत आहे. कथा तेवढीच चांगली असेल का हा नंतरचा प्रश्न, पण एक चांगला अनुभव मिळेल हे नक्की.

चला तर मंडळी, आता टीझर पाहून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required