व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क असा तयार झाला अक्षय कुमारचा २.० मधला लुक !!

आपण जेव्हा कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो त्याच्याही आधीपासून रोबॉटच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे. गेल्याचा आठवड्यात आलेल्या २.० च्या ट्रेलरने रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक मोठा सरप्राईज दिला होता. शेवटी तो साऊथचा चित्रपट असल्याने काही लोकांना तो नको तितका फिल्मी आणि बालिश वाटू शकतो. पण तो मुद्दा वेगळा. आजचा आपल्या व्हिडीओ ऑफ दि डे चा विषय आहे अक्षय कुमारचा अफलातून लुक.

२.० मधला अक्षय कुमारचा लुक सुरुवातीपासूनच गाजतोय. त्याचा हा लुक तुम्ही नक्कीच बघितला असणार. हा लुक तयार करण्यासाठी मेकअप पासून ते VFX पर्यंतच्या कलाकारांनी कशा प्रकारे मेहनत घेतली याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ सध्या रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओ मधून अक्षय कुमारच्या त्या अनोख्या लुक मागची अनेक तासांची मेहनत दिसून येते. चला तर आज पाहूया अक्षय कुमारने साकारलेला व्हिलन तयार कसा झाला ते !!

सबस्क्राईब करा

* indicates required