'धक धक गर्ल' माधुरीचा अखेर मराठीत सिनेमा येतोय, टीझर पाह्यलात की नाही ?

अय्या माधुरी दीक्षित...दीक्षित म्हणजे मराठी ना ? मग एकपण मराठी पिच्चर का नाही केला तिने ? हिला तर मराठी बोलता पण येत नाय....असं म्हणणाऱ्यांना माधुरी आता तिच्या नव्या सिनेमातून ‘मधुरा साने’ बनून भेटायला येणार आहे. माधुरी दीक्षित मराठी सिनेमात कधी काम करणार हा प्रश्न सिनेमा जगतात आणि खास करून मराठी माणसांच्या मनात होताच. त्याला उत्तर म्हणजे माधुरीचा पहिला मराठी सिनेमा ‘बकेट लिस्ट’  

या सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला आहे, पण टीझर बघण्याआधी थोडं चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.

काय आहे सिनेमा ?

हा सिनेमा एका साधारण स्त्रीच्या जीवनावर आधारित आहे. हे वरकरणी दिसत असलं तरी टीझर मध्ये मधुराच्या तोंडी ‘सई’ हे नाव येतं आणि तिथून एक वेगळी कथा सुरु होताना दिसते. कदाचित सईचं पात्र या कथेतील एक वेगळं वळण असेल. पण ही सई कोण आणि तिची भूमिका कोणी साकारली आहे हे मात्र अजून समजलेलं नाही. याबरोबरच सिनेमाचं नाव बकेट लिस्ट का आहे हाही एक प्रश्न पडतोच.

स्रोत

माधुरी बरोबरच वंदना गुप्ते, सुमीत राघवन, शुभा खोटे असे इतर मराठीतील नावाजलेले कलाकार या टीझर मध्ये दिसत आहेत. खबर तर अशी पण आहे की रेणुका शहाणे सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे, पण टीझर मध्ये मात्र ती दिसत नाही. (हीच तर सई नसेल ना ?)

आता माधुरीच्या मराठी बद्दल बोलायचं झालं तर तिथे थोडी उन्नीस बीस दिसू शकते. पण हे फक्त टीझर वरून ठरवता येणार नाही ना राव. यासाठी सिनेमा बघावा लागेल. पण या सिनेमावाल्यांनी रिलीजची तारीख अजून सांगितलेली नाही. म्हणजे आपल्याला काही काळ वाट बघावी लागणार आहे.

एकूण माधुरी दीक्षित मराठीत पदार्पण करायला तयार झाली आहे पण तिचं हे पदार्पण यशस्वी होईल का ? ते पुढच्या काळात ठरेल. पण तुम्ही आत्ताच ठरवू शकता, टीझर चांगला आहे की नाही ते....

सबस्क्राईब करा

* indicates required