computer

गेम ऑफ थ्रोन्सची थीम चक्क ढोलताशांवर?? अस्सल GOT फॅन आणि मर्दमराठे असाल तर ऐकायलाच हवी..

अगदी चार दिवसांनी गेम ऑफ थ्रोन्सच्या शेवटच्या सिझनला सुरुवात होणार आहे राव. गेल्या महिन्यात ट्रेलर आल्यापासून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणी जुन्या एपिसोड्सची पारायणं करतंय तर कोणी स्पॉईलर्स पासून स्वतःचा बचाव करतंय. ते गुप्त थियरी वगैरे सांगणारे महाज्ञानी तर युट्युबवर पडीक झाले आहेत. अशी पण शंका आहे की पहिल्याच एपिसोडला काही लोकांना आनंदाने फिट येईल. ते एक असो.

राव आजचा आमचा मुद्दा थोडा वेगळा आहे. नुकतीच चाहत्यांची ही उत्सुकता डोंबिवलीच्या रस्त्यांवर दिसून आली. मुंबईच्या आरंभ ढोल-तशा पथकाने फायनल सिझनच्या निमित्ताने गेम ऑफ थ्रोन्सची थीम म्युझिक चक्क ढोल तशांवर वाजवली आहे. त्यांनी या आयकॉनिक थीम म्युझिकला दिलेला अस्सल मराठमोळा टच भन्नाट, लाजवाब, कडक आहे. चला तर आता जास्त वेळ न घालवता हा व्हिडीओ पाहा !!

मंडळी, हा व्हिडीओ गुढीपाडव्याच्या दिवसाचा आहे. यात बुलबुल (बँजो) आणि ढोल ताशा वापरण्यात आले आहेत. पूर्णपणे मराठमोळ्या अंदाजात आरंभ टीमने गेम ऑफ थ्रोन्सला खास मराठी अंदाजात सलामी दिली आहे. अशा या भन्नाट प्रयोगाला वाह वाह मिळणार नाही असं होईल का ? लोकांनी भरभरून कौतुक केलं आहे.

गेम ऑफ थ्रोन्सच्या थीम म्युझिकचं भारतीय व्हर्जन यापूर्वी पण करण्यात आलं होतं. तुषार लाल या संगीतकाराने पिआनो, तबला आणि बासरीवर ही म्युझिक वाजवली होती. ELTC या युट्युब चॅनेलने गणेश विसर्जनाचा व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओ मध्ये नाशिक ढोलच्या आधारे GOT ची थीम म्युझिक तयार करण्यात आली होती. आता या जोडीला आरंभ टीमचं नाव घेतलं जाणार आहे.  

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ ?? आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required