व्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय ? मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा !!

मंडळी, चित्रपट थेटरात लागल्यानंतर अगदी २ ते ३ दिवसात तो प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आलेला असतो. याचं श्रेय अर्थातच टोरंटला जातं. नुकताच आलेला सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ चित्रपट पण टोरंटवर लिक झाला होता. पण या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक भन्नाट योजना आखली होती. पाहा हा व्हिडीओ !!

मंडळी, अरीना मंडल नावाच्या मुलाने टोरंटवरून ३.८ जीबी साईजचा ‘उरी’ चित्रपट डाऊनलोड केला होता. त्याचा समज झाला की ३.८ जीबी म्हणजे चित्रपट नक्कीच HD मध्ये असणार. पण चित्रपट सुरु झाल्यानंतर त्याला समजलं की हा एक सापळा होता आणि तो त्यात अडकला आहे.

अरीना मंडलने जी फाईल डाऊनलोड केली होती ती खुद्द चित्रपट निर्मात्यांकडूनच लिक करण्यात आली होती. या फाईल मध्ये चित्रपटाऐवजी एक व्हिडीओ होता. या व्हिडीओच्या माध्यमातून यामी गौतम, विकी कौशल यांनी प्रेक्षकांना चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघण्याचं आवाहन केलं आहे.

स्रोत

अरीना मंडलने आपला हा अनुभव फेसबुकवर शेअर केल्यानंतर लोकांनी ‘उरी’ टीमचं कौतुक केलंय. शेवटी टोरंटच्या विरोधात टोरंटवरूनच जनजागृती करण्याची आयडिया भन्नाट आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required