'दोघांत तिसरा, आता सगळं विसरा' उर्फ 'मुंबई-पुणे-मुंबई ३' चा ट्रेलर पाहिला का भाऊ??

Subscribe to Bobhata

मराठी सिनेमांनी आता हिंदी सिनेमांना मागे टाकायला सुरुवात केली आहे. दर्जेदार कथा आणि उच्च निर्मिती मूल्य असणारे मराठी चित्रपट येऊ लागले आहेत. नुकताच आलेला आणि....डॉ काशिनाथ घाणेकर व नाळ या दोन सिनेमांनी लागोपाठ बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. यावेळी तर आमीरच्या सिनेमालाही त्यापुढे नमतं घ्यावं लागलं. एका बाजूला मराठीत अशा वेगळ्या आशयाचे सिनेमे येत असताना दुसऱ्या बाजूला जुन्याच फोर्म्युल्यावर सिनेमे बनणं थांबलेलं नाही. अशाच कॅटेगरीतला सिनेमा आहे मुंबई-पुणे-मुंबईचा तिसरा भाग. 

स्रोत

पहिल्या भागात प्रेम आणि दुसऱ्या भागात लग्न याभोवती कथानक फिरल्यानंतर आता बाळाभोवती  सिनेमा बनला आहे. कालच आलेल्या ट्रेलरने सिनेमाचं गुपित उघड केलं आहे. राव, ट्रेलर वाईट आहे अशातला भाग नाही पण ह्या कथानकावर सिनेमा बनला नसता तरी मराठी सिनेसृष्टीचं फारसं नुकसान झालं नसतं. कौटुंबिक कथा आणि घरात येणारा नवा पाहुणा या कथानकात तसं फारसं नाविण्य उरलेलं नाही.

स्वप्नील जोशी आणि मुक्ताची जोडी नेहमी प्रमाणे खुलून दिसत आहे. दोघांव्यतिरिक्त ‘मुंबई-पुणे-मुंबई २ मधली सगळी कास्टिंग तिसऱ्या भागातही आहे. ‘ग साजणी’ या गाण्याची नवी आवृत्ती सिनेमात असेल हे ट्रेलरच्या शेवटी कळतं. हे गाणं मात्र मराठी माणसाला नक्कीच भुरळ घालेल. 

तर मंडळी, ‘मुंबई पुणे-मुंबई ३’चा ट्रेलर पाहून घ्या आणि आम्हाला सांगा तुम्ही हा सिनेमा बघणार का ?

 

आणखी वाचा :

भारतीय चित्रपटात 'इंटरव्हल' का असतो राव ? कुठून झाली याची सुरुवात ??

नेटफ्लिक्सचा धमाका !! 9 ओरिजिनल चित्रपटांची घोषणा !! यातले तर दोन 'मराठी' आहेत भाऊ...

बॉक्स नाही, ऑफिस नाही, मग ही बॉक्सऑफिस काय भानगड आहे भाऊ ?

सबस्क्राईब करा

* indicates required