नागराज मंजुळेची पहिली शॉर्टफिल्म ‘पिस्तुल्या’ बघून घ्या लवकर !!

नागराज मंजुळे सध्या अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘झुंड’ या सिनेमाच्या निर्मिती मध्ये व्यस्त आहे. फँड्री आणि सैराट नंतर त्याने एक दिग्दर्शक म्हणून आपलं स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. या सर्वांना ज्या एका शॉर्टफिल्म पासून सुरुवात झाली ती शॉर्टफिल्म म्हणजे ‘पिस्तुल्या’. नागराज मंजुळे दिग्दर्शित ही पहिलीच कलाकृती आणि तिने राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत मजल मारली.

राष्ट्रीय पुरस्कारांबरोबर मटा सन्मान, हैद्राबाद अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, लखनऊचा चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हल अश्या मानाच्या महोत्सवांमध्ये देखील सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मचा पुरस्कार मिळवला. याच पिस्तुल्या मध्ये नागराजच्या फँड्रीची बीजे सापडतात. त्यानंतर आलेला सैराट हा त्याचच दुसरं रूप.

पिस्तुल्याची गोष्ट थोडक्यात.

स्रोत

आधी तर पिस्तुल्या या नावाबद्दल जाणून घेऊ. पारधी समाजात अश्या प्रकारची नावे आढळून येतात. काडतूश्या, वकिल्या, फौजदाऱ्या, बंदुक्या इत्यादी. अशी नावे ही पारधी समाजाची पद्धत आहेत. यापाठी एक असं निश्चित कारण नाही.

आता वळूयात पिस्तुल्याकडे. पिस्तुल्या हा पारधी समाजातला मुलगा आहे. पारधी समाजात शिक्षणाचा अभाव असला तरी पिस्तुल्याला मात्र शिकण्याची प्रचंड इच्छा आहे. पण त्याच्या आयुष्यात काही घटना अश्या घडतात की त्याची आई त्याला एका अश्या माणसाच्या स्वाधीन करते जो त्याला चोरी करायला शिकवेल. पण पिस्तुल्याच्या डोक्यात असलेलं शिक्षणाचं भूत चोरी करत असतानाही गेलेलं नसतं. शेवटी तो याच चोरीचा वापर करून काय करतो ते प्रत्यक्ष शॉर्टफिल्म मध्येच बघितलेलं बरं.

चला आज नागराज मंजुळे या एका गुणी दिग्दर्शकाची पहिली कलाकृती बघुयात.

सबस्क्राईब करा

* indicates required