शिवागामीदेवी महिष्मतीनगरी सोबत आता आली थेट नेटफलिक्सवर...वाचा - कधी आणि नक्की काय दाखवणार ?

मंडळी, भव्यदिव्य बाहुबली सिनेमाचे दोन भाग आले.  पण भारतीय पब्लिकची भूक काही भागली नाही. अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आणि अनेक चाहत्यांनी म्हटलं की ते फक्त २ भाग पुरेसे नाहीत. राव, भारतीयांवर नेटफ्लिक्सवाले भलतेच खुश दिसतायत. त्यांनी बाहुबलीच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलंय.

स्रोत

गेल्या वर्षी ‘बाहुबली : राईज ऑफ शिवागामी’ हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. याच पुस्तकावर आधारित नेटफ्लिक्सची ‘बाहुबली : बिफोर दि बिगिनिंग’ ही नवी सिरीज येणार आहे. यात शिवगामीचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात येणार आहे. शिवगामीच्या कथेबरोबरच महिष्मती साम्राज्याचा भव्य इतिहाससुद्धा दाखवण्यात येईल. नेटफ्लिक्सने शिवगामीची कथा २ सिझन्समध्ये सांगण्याचा बेत आखला आहे. पहिल्या सिझनमध्ये ९ एपिसोड्स असणार आहेत.

मंडळी, बाहुबली गाजला तो त्याच्या अफलातून स्पेशल इफेक्ट्समुळे. या सिरीजमध्येही असाच काहीसा मसाला पाहायला मिळेल. राजकारण, खुमासदार संवाद, डोळे दिपवणारे युद्ध, तगडी कास्टिंग असं सगळं काही असेल. बाहुबलीच्या चाहत्यांची चंगळ होणार आहे राव !!

स्रोत

राव, एका गोष्टीने मात्र बाहुबलीचे चाहते नाराज होऊ शकतात. ही सिरीज राजामौली दिग्दर्शित करणार नसून त्यांच्या जागी 'देवा कट्टा' आणि 'प्रवीण सत्तारू' हे दिग्दर्शन करणार आहेत.

सेक्रेड गेम्सनंतर नेटफ्लिक्सने भारतीय ओरिजिनल सिरीजची रांगच लावली आहे. याच महिन्यात ‘घौल’ ही हॉरर सिरीज येणार आहे. पण सर्वात जास्त उत्सुकता आहे बाहुबली सिरीजची.

 

आणखी वाचा :

बाहुबली आणि लायन किंग : दोन्ही चित्रपटातील साम्य तुम्ही हेरलं का?

बाहुबली सारखं हत्तीच्या सोंडेवर चढायला गेला आणि....तुम्हीच बघा पुढे काय झालं !!

भल्लालदेवाचा ह्यो भयानक रथ नेमका चालतोय तरी कशावर ?

VFX चा वापर करताना फक्त हिरवा आणि निळा रंगच का वापरला जातो ?

सबस्क्राईब करा

* indicates required