राजकुमार राव चक्क करतोय दहशतवाद्याची भूमिका...'ओमार्टा'चा ट्रेलर पाह्यलात का ?

शाहीद, सिटीलाईट्स, अलिगढ, सिमरन आणि आगामी मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित ‘The Accidental Prime Minister’ या चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता एक नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं नाव आहे ‘ओमार्टा’. २० एप्रिल २०१८ रोजी ओमार्टा रिलीज होणार आहे.

‘ओमार्टा’ म्हणजे काय ?

स्रोत

हा एक इटालियन शब्द असून याचा अर्थ होतो एक प्रकारची शपथ. पोलिसांच्या किंवा अन्य कोणाच्या दबावाखाली येऊन आपल्या संघटनेची गुपितं खुली न करण्याची शपथ प्रत्येक गुन्हेगार, माफिया किंवा दहशतवाद्यातर्फे घेतली जाते. याद्वारे ते आपली निष्ठा वाहतात.

 

काय आहे चित्रपट ?

स्रोत

२०१७ हे वर्ष राजकुमार राव या अभिनेत्याचं वर्ष होतं. टॅप्ड, बरेली की बर्फी आणि न्यूटन या तिन्ही सिनेमातून दर्जेदार काम करून त्याने आपली नवी जागा तयार केली. याच उमद्या कलाकाराने ‘ओमार्टा’ मध्ये मुख्य भूमिका केली आहे.

ही कथा आहे ‘अहमद ओमर सईद शेख या मुळच्या पाकिस्तानी असलेल्या ब्रिटीश दहशतवाद्याची. त्याचा जन्म लंडन मध्ये झाला. त्याचं शिक्षण देखील लंडन मध्ये झालं. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’चा तो विद्यार्थी होता, पण शाळेत असतानाच त्याची आणि जिहादी विचारांची ओळख झाली आणि त्याचं आयुष्य बदललं. तो कट्टरपंथीय झाला. त्याने शिक्षण सोडून दहशतवादाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. तो चर्चेत आला एका पत्रकाराच्या हत्येने. त्याने २००२ साली ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे पत्रकार ‘डॅनियल पर्ल’ यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. त्याआधी अमेरिकेतील ट्वीन टॉवर दुर्घटना म्हणजे ९/११ च्या घटनेतही त्याचं नाव समोर आलं होतं.

स्रोत

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून या ट्रेलर वरून तर दिसतंय की सिनेमा नक्कीच ‘फाडू’ असणार बॉस. ‘शाहिद’, ‘अलिगढ’, ‘सिटीलाइट्स’ या तीन चित्रपटांमध्ये हंसल मेहता आणि राजकुमार राव यांनी एकत्र काम केलं आहे. आता ओमार्टा मध्ये दोघांची तीच जुगलबंदी दिसत आहे. राजकुमार रावच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वर्षी त्याने आपली चमक दाखवली आहेच पण तो प्रत्येक चित्रपटाबरोबर आपण अभिनयात किती सरस आहोत हे दाखवून देतोय. ओमार्टा मध्ये त्याने पुन्हा एकदा कमाल केली आहे.

चला तर आता तुम्ही सुद्धा ट्रेलर बघून घ्या....

सबस्क्राईब करा

* indicates required