एका ‘न्यूड’ मॉडेलची कहाणी...ट्रेलर बघितला का ?

मंडळी, गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात ज्या चित्रपटाने होणार होती तोच सिनेमा तडकाफडकी महोत्सवातून काढण्यात आला. हा सिनेमा म्हणजे न्यूड (चित्रा).

महोत्सवातून बाहेर काढल्यानंतर या सिनेमाच्या चर्चेला सुरुवात झाली. एका फिल्म फेस्टिव्हल मधून अश्या प्रकारे चित्रपट काढून टाकण्याची ही दुर्मिळ घटना होती. न्यूड हे नाव आणि चित्रपटातील विषयाला घेऊन हा वाद पेटला होता. या वादाला उत्तर म्हणून सिनेमाचा टीझर सुद्धा रिलीज केला गेला. हा वाद सुरु असताना याविरोधात सिने क्षेत्रातल्या कलाकारांनी आवाज उठवला होता पण अपेक्षित तसा विरोध झाला नाही.

स्रोत

महोत्सवातून बाहेर पडल्यानंतर प्रश्न होता सेन्सॉर बोर्डच्या कात्रीचा. राव, आपल्या संस्कारी सेन्सॉर बोर्डला हा सिनेमा किती रुचेल याबद्दल शंकाच होती. ‘उडता पंजाब’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, अश्या सिनेमाची ताजी उदाहरणं होतीच. पण सुदैवाने सेन्सॉर बोर्डने या सिनेमातून एकही सीन कट न करता सिनेमाला हिरवा कंदील दिला आहे. सर्व वादातून बाहेर पडल्यानंतर न्यूड २५ एप्रिल रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूडचा ट्रेलर बघण्याआधी त्याच्याविषयी थोडं जाणून घेऊया.

सिनेमाविषयी थोडं :

स्रोत

रवी जाधव चा हा सिनेमा आपल्याला त्या महिलांच्या विश्वात घेऊन जातो ज्या कला महाविद्यालयात न्यूड मॉडेल म्हणून काम करतात. सिनेमाचं कथानक एका बाईच्या जगण्याची धडपड दाखवून जातं. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि दोन वेळच्या अन्नासाठी न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एक स्त्रीची ही गोष्ट आहे. या ट्रेलर मध्ये नसिरुद्दीन शहा यांच्या तोंडी असलेलं एक वाक्य संपूर्ण सिनेमाचा सार सांगून जातं, “कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही,”

विषय अर्थात बोल्ड आहे पण विषय तितकाच महत्वाचा देखील आहे. रवी जाधव बालक पालक नंतर कुठे तरी हरवला असं वाटत होतं पण आता तो न्यूड मधून पुन्हा परत आलाय असं आपण म्हणू शकतो.

चला तुम्ही सुद्धा ट्रेलर बघून घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required