मुंबई अटकली, मलिष्काची सटकली - सोनू नंतर मलिष्का घेऊन आली आहे झिंगाट.....व्हिडीओ पाहिलात का ??

‘सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय’ या गाण्यातून मुंबईची ‘व्यथा’ मांडणारी RJ मलिष्का यावर्षी नवं गाणं घेऊन आली आहे. यावेळी तिनं मराठीतलं गाजलेलं ‘झिंगाट’ गाणं निवडलंय.
नुकताच एका मोठ्या पावसाने मुंबईत पाणी भरलं, खड्ड्यांचा पूर्वापार चालत आलेला प्रश्न पुन्हा उद्भवला, रेल्वे ठप्प पडली, सगळं विस्कळीत झालं. एकंदरीत गेल्यावर्षी तिने ज्या मुद्द्याना हात घातला होता त्यात फारसा बदल झालेला नाही. उलट दरवर्षी परिस्थिती आणखीच बिघडत जाते, ते ही यावर्षी काही बदललेलं नाही. मलिष्काने याच साऱ्या व्यथा या गाण्यातून मांडल्या आहेत. 

आणखीच आम्ही गाण्याबद्दल जास्त काही सांगण्यापेक्षा तुम्हीच हे गाणं ऐका. 

गेल्यावर्षी सोनू गाण्यावरून मोठा वाद झाला होता. मलिष्का आणि शिवसेना या दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. मलिष्काच्या व्हिडीओला उत्तर म्हणून शिवसेनेने सुद्धा असाच एक व्हिडीओ बनवला होता आणि तिच्या घरावर धाड टाकून तिथं डासांच्या पैदाशीसाठी कसं  अनुकूल वातावरण आहे हे दाखवलं होतं. काही लोकांच्या मते हा पालिका अधिकाऱ्यांचा बनाव होता. काही असो, पालिकेनं तेव्ह  नागरिकांनी केलेल्या तक्रारीची अशा भयानक विनोदी पद्धतीनं दखल घेतली होती. ऐन पावसाळ्यात मौजच मौज झाली होती राव.

तर, गेल्यावर्षी अशा तऱ्हेची कोंबड्यांची झुंज झाली होती. त्यातून काही भलं होण्याऐवजी एक नगण्य घटक नेहमी प्रमाणे दुर्लक्षित राहिला. हा घटक म्हणजे मुंबई. यावर्षीही मुंबईचे रस्ते खड्ड्यांनी भरलेले, पावसाने पाणी तुंबून मुंबईची तुंबई झालीय(यावर्षी मिळालेलं नवीन नाव), वाहतुकीचा तर प्रश्न आहेच. 

जे गेल्या वर्षी झालं नाही, ते यावर्षीच्या या नव्या व्हीडिओनेही होईल असं काही वाटत नाही. हां, या व्हिडीओतून पुन्हा एकदा वाद पेटू शकतो. पुन्हा डिजिटल युद्ध होईल. ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड होऊ शकतो. किंबहुना झाला आहे, वादामुळे सगळेजण युट्युबवर व्हिडीओ बघायला जाणार. व्हिडीओचे व्ह्यूज वाढतील. सध्या एवढंच होईल की पुढील काही वर्षात मुंबईच्या नावावर एक पावसाळी अल्बम तयार होऊ शकतो. बाकी मुंबईकरांना पावसापासून वाचवण्यासाठी त्याचं सो कॉल्ड स्पिरीट आहेच की !!

मंडळी, आता प्रश्न असा आहे की या गाण्यावरून मुंबई महानगरपालिकेला जाग येणार का ?? त्याचं पुढं बघू हो....

तर, याच आठवड्यात धडक येतोय, त्याच्या पार्श्वभूमीवर हे गाणं गाजणार हे मात्र नक्की.

 

आणखी वाचा :

मलिष्का का म्हणतेय, 'बीएमसी तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?'

सबस्क्राईब करा

* indicates required