महाराष्ट्राच्या लाडक्या 'भाईं'चा बायोपिक आलाय राव....टीझर पाह्यला नसेल तर लगेच पाहून घ्या !!!

Subscribe to Bobhata

आजचा दिवस २ कारणांनी खास आहे. पहिलं कारण म्हणजे आज महाराष्ट्राच्या लाडक्या पुलंचा शंभरावा वाढदिवस आहे आणि दुसरं कारण असं की त्यांच्याच आयुष्यावर आधारित सिनेमाचा आज टीझर रिलीज झाला आहे. भाई - व्यक्ती की वल्ली हा तो सिनेमा.

‘उद्या माझा कोणी पुतळा वगैरे करायचं ठरवलं तर मी त्याच्याखाली एवढंच लिहा असं सांगेन - या माणसाने आम्हाला हसवले.’ हे टीझर मधलं वाक्य विशेष लक्षात राहतं. पण पुलंनी फक्त लोकांना हसवलं का ? तर नाही. ते एक उत्तम नट, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, तसेच उत्कृष्ट वक्ते होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. महत्वाचं म्हणजे त्यांनी सामान्यातील सामान्य व्यक्तीला कळेल अशा भाषेत लिहून साहित्य समृद्ध करण्याचं काम केलं. कदाचित म्हणूनच सिनेमाच्या नावाखाली ‘व्यक्ती की वल्ली’ हे वाक्य जोडण्यात आलं असावं.

स्रोत

महेश मांजरेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे तर संवाद रत्नाकर मतकरी यांचे असतील. यापूर्वी रत्नाकर मतकरी यांनी पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकाचं नाट्य रुपांतर केलं होतं. हंटर आणि वायझेड चित्रपटात झळकलेला सागर देशमुख पुलंच्या भूमिकेत असणार आहे. सुनिता बाईंच्या भूमिकेसाठी इरावती हर्षे यांची निवड झाली आहे. याशिवाय पुलंच्या अवतीभवती असणारी अनेक मोठी मंडळी चित्रपटात दिसणार आहेत. यापैकी आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका कोण साकारणार याचं उत्तर टीझर मध्ये मिळालं आहे.

मंडळी, एकंदरीत भट्टी छान जमली आहे. आता पुलं पुन्हा एकदा आपल्या भेटीस येणार हे नक्की.

चला तर टीझर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि हो, पोस्ट शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required