भावेश जोशी : सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅनच्या जमान्यात हा नवीन सुपरहिरो कोण आहे राव ?

Subscribe to Bobhata

सध्या इन्फिनिटी वॉरचे वारे वाहत आहेत. कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन, हल्क, स्पायडरमॅन इत्यादी सुपर्हीरोंनी मिळून थानोस विरुद्ध युद्ध पुकारलंय. ते जगाला वाचवू शकतात का या गोष्टी तुम्ही सिनेमात बघू शकता. मंडळी, हे सुपरहिरो फक्त सिनेमात किंवा पुस्तकात छान वाटतात. त्यांची कल्पना आपण मनात करू शकतो पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. हे काल्पनिक जग आपल्याला थोड्यावेळापुरतं वेगळा अनुभव देतं पण पुन्हा आपल्याला आपल्याच जगात यावं लागतं. मग प्रश्न पडतो आपल्या रोजच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कोणता सुपरहिरो आहे राव ?

याचं उत्तर म्हणजे आगामी ‘भावेश जोशी’ हा सिनेमा.

अनिल कपूर यांचे सुपुत्र हर्षवर्धन कपूर ‘भावेश जोशी’ म्हणून दिसणार आहेत. आजवर भारतात जे काही मोजके सुपरहिरो चित्रपट आले त्यातील भावेश जोशी हा वेगळा वाटत आहे. आता तुम्ही चित्रपटचं नावचं बघा ना. सुपरहिरोचं नाव भावेश जोशी, हे एवढं सोप्प असतंय का ? 

स्रोत

मंडळी, सामान्य नाव म्हणजेच हा सुपरहिरो तुमच्या आमच्यातीलच एक आहे. राव, सुपरहिरो चित्रपटातून सुपरहिरो व्हिलनवर मात करताना दाखवलं जातं. पण तेच जर खऱ्या आयुष्यात घडलं तर ते नेमकं कसं घडेल हे भावेश जोशीच्या ट्रेलर मधून दिसतं. खऱ्या आयुष्यात वाईट गोष्टींविरुद्ध लढताना काय समस्या येतात हे दाखवण्याचा प्रयत्न भावेश जोशी मधून होईल असं तूर्तास तरी वाटत आहे. मुखवटा घातलेला सुपरहिरो त्याला अडचणीत टाकणारे राजकारणी आणि त्यातून मार्ग काढत दाखवलेलं वास्तव हे सुद्धा आपण ठळकपणे पाहू शकतो.

देशातील विविध समस्यांवर तरुणांमध्ये राग एकवटला आहे. या रागाला वाचा फोडणाऱ्या तरुणांचा चेहरा म्हणजे (हेल्मेट घातलेला सुपरहिरो) ‘भावेश जोशी’.

मंडळी भारतीय सिनेमात पहिल्यांदाच सुपरहिरो या जॉनरला घेऊन एक वेगळा प्रयोग होताना दिसतोय. त्याचं कौतुक तर आहेच. हा प्रयोग फसेल की हिट होईल हे भविष्य सांगेल. तो पर्यंत तुम्ही ‘भावेश जोशी’चा ट्रेलर बघून घ्या.

 

आणखी वाचा :

हेल्मेट घालणारा सुपर हिरो बघितलाय का ? नसेल तर हा टीझर एकदा बघाच !!

सबस्क्राईब करा

* indicates required