पुष्पक विमानात बसून काशीनाथ घाणेकर येणार....या दोन मराठी चित्रपटांबद्दल वाचलं का ?

आपले बालगंधर्व उर्फ़ लोकमान्य उर्फ सदाशिव उर्फ सुबोध भावे यंदा दोन भन्नाट चित्रपट घेऊन येत आहे. पहिला चित्रपट हा त्याच्याच प्रोडक्शनखाली तयार झाला आहे तर दुसरा  वायकॉम १८ मोशन पिक्चर्सची निर्मिती असणार आहे.

चला तर दोन्ही सिनेमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मंडळी, पहिला सिनेमा असणार आहे ‘पुष्पक विमान’. नातू आणि आजोबांमाधल्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमातील मुख्य भूमिकांबाबत अद्यापही खुलासा करण्यात आलेला नाही. पण प्राथमिक माहिती वरून सुबोध भावे आणि मोहन जोशी हे मुख्य भूमिकेत असतील असं दिसतंय.

‘कट्यार काळजात घुसली’ नंतर बऱ्याच दिवसांनी सुबोध भावे ‘झी स्टुडीओ’ बरोबर काम करतोय. या सिनेमाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला. टीझर मधून चित्रपटाच्या विषयाबद्दल काही प्रमाणात अंदाज येतो. हा टीझर तुम्ही खाली बघू शकता.

दुसरा सिनेमा आहे एका नटश्रेष्ठ व्यक्तीवर. चित्रपटाचं नाव आहे ‘आणि...काशिनाथ घाणेकर’. काशिनाथ घाणेकर यांनी एकेकाळी रंगभूमी गाजवली होती. त्यांच्या फक्त नावाने नाटकं चालायची. म्हणूनच त्यांना रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार म्हटलं जातं. सुबोध भावी त्याच्या दुसऱ्या चित्रपटातून काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारणार आहे. त्याचा पहिला लुक असलेला पोस्टर कालच रिलीज करण्यात आला. सुबोध बरोबर सोनाली कुलकर्णी आणि सुमित राघवन यांच्या मुख्य भूमिका चित्रपटात असणार आहेत.

मंडळी पिरीयड फिल्म्स मध्ये काम करण्यासाठी सुबोध भावे हा हक्काचा नट असल्या सारखं दिसत आहे. आता तुम्हीच बघा ना, बालगंधर्व कोणी साकारावा तर सुबोधनेच, लोकमान्य कोणी साकारावा तर सुबोधनेच, कट्यार मधल्या सदाशिवची भूमिका कोण निभावणार तर सुबोधच. पर्यायाच नाही राव. आता काशिनाथ घाणेकर म्हणून सुद्धा सुबोधचं दिसणार आहे.

मंडळी, गेल्या वर्षी सुबोध भावेचे अनेक टुकार सिनेमे येऊन गेले. एकेकाळी बालगंधर्व आणि लोकमान्य साकारलेला नटाने इतक्या टुकार सिनेमात काम करावं हे पचवताना अवघड गेलं. या आगामी दोन्ही सिनेमातून सुबोध भावेची पुन्हा एकदा दमदार एन्ट्री होईल असं आपण गृहीत धरूया.

सबस्क्राईब करा

* indicates required