ख्वाडा आणि बबन नंतर येत आहे ‘हैद्राबाद कस्टडी’....पोस्टर बघून घ्या राव !!

ख्वाडा आणि बबनच्या निर्मितीनंतर भाऊराव कऱ्हाडे यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटचं नाव आहे ‘हैद्राबाद कस्टडी’. चित्रपट रसिकांसाठी आता फक्त हैद्राबाद कस्टडीचे पोस्टर रिलीज करण्यात आलेले आहे.

भाऊसाहेबांच्या आता पर्यंतच्या दोन्ही कलाकृती लोकजीवनाशी, लोकाभिमुख आणि ग्रामीण जीवनावर भाष्य करणाऱ्या होत्या. त्यांच्या “The Folk Confluence” या संकल्पनेशी मिळत्याजुळत्या होत्या. त्यामुळे हैद्राबाद कस्टडी हा चित्रपटपण लोकजीवनाशी निगडीत असेल अशीच अपेक्षा आहे.

जरा, लक्षपूर्वक या पोस्टरकडे बघितलं तर सहज लक्षात येतंय की हा चित्रपट कस्टोडियल डेथ म्हणजे पोलीस कस्टडी मधल्या संशयित गुन्हेगाराच्या मृत्यूबद्दल असावा. हैद्राबाद हा शब्द जोडला तर कदाचित हा चित्रपट मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रात आला किंवा हैद्राबाद मुक्ती संग्रामावरती आधारित असावा.

पोलिसांचा तपासाचं काम काहीवेळा फारच अमानुष असतं. समोरच्या संशयिताला फक्त ‘थर्ड डिग्री’ कळते असंच बहुतेक पोलिसांना शिकवलेलं असतं. बऱ्याचवेळा या तपासकामात एखाद्या निर्दोष संशयितांचा मृत्युपण होतो. अशी प्रकरणं दाबली जातात. पोलीस उजळ माथ्याने फिरत राहतात पण मृताला न्याय मिळत नाही.

पोस्टरवर दिसणारी ही पोलीस स्टेशनची रूम खास इन्व्हेस्टीगेशन रूम आहे. अंधारलेली आहे. भिंतीत ओल चढली आहे. टेबल फक्त समोरासमोर बसण्यासाठी आहे. टेबलावर एकही कागद नाही. आहे तर फक्त ‘गिरणीचा पट्टा’ ज्यानी संशयिताला फटकावून काढायचाय. एखादा फटका वर्मी बसला तर “ख्वाजा युनुस” व्हायला वेळ लागत नाही.

अत्यंत जळजळीत सामाजिक प्रश्नावर झोत टाकणारा हा चित्रपट असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. ऑल दि बेस्ट टीम ‘हैद्राबाद कस्टडी’.

सबस्क्राईब करा

* indicates required