हेल्मेट घालणारा सुपर हिरो बघितलाय का ? नसेल तर हा टीझर एकदा बघाच !!

Subscribe to Bobhata

तिकडे हॉलीवूड मध्ये स्पायडरमॅन, बॅटमॅन, आंटमॅन, आयर्नमॅन, एक्समॅन असले किती मॅन होऊन गेले राव. आणि आपल्याकडे शक्तिमान आणि क्रिश शिवाय कोणताही सुपरहिरो शिल्लक नाही. (शारुख दादुसचं नाव नाही घेत कारण तो स्वतःच रावणची आठवण काढायला घाबरतो.)

आता शक्तिमान तात्या रिटायर झालाय आणि क्रिश तर किती वर्ष झाले आलेलाच नाही. भारताकडे त्यांच्या शिवाय दुसरा सुपरहिरो नाही राव. म्हणूनच ही कमी भरून काढण्यासाठी एक नवीन सुपरहिरो येतोय. हा सुपरहिरो जरी असला तरी त्याला कोणतंही जबरी नाव नाही. त्याचं नाव एकदम साधं सोप्प आहे. “भावेश जोशी”

स्रोत

आपल्या अनिल कपूर तात्याचा पोरगा ‘हर्षवर्धन कपूर’ या नवीन सुपरहिरो पिच्चर मध्ये काम करतोय. त्याचच नाव आहे ‘भावेश जोशी’. या पिच्चरचा टीझर कालच सोशल मिडीयावर दाखल झाला. टीझर मध्ये तर या लोकांनी धमाका केलाय भाऊ. फुल टू अॅक्शन दिसतेय. आता तुम्हाला वाटेल की या सुपरहिरोचे कपडे कसे असतील. तर मंडळी आठवण करून देतो. भावेश जोशी हे नाव जसं साधं आहे तसंच त्याचे कपडे सुद्धा साधे आहेत. एक हेल्मेट आणि काळे कपडे. एवढच. जेव्हा त्याच्या हेल्मेटचे लाल लाल डोळे चमकतात तेव्हा मस्त सुपरहिरोचा फील येतो राव. पण एकंदरीत हा सुपरहिरो कसा आहे ते टीझर मधून पूर्णपणे दिसत नाही.

इरॉस इंटरनॅशनल, रिलायंस एंटरटेन्मेंट, विकास बहल, मधू मंटेना आणि अनुराग कश्यप या सगळ्या तगड्या लोकांनी एकत्र येऊन हा पिच्चर बनवलाय. डायरेक्टर आहेत विक्रमादित्य मोटवानी. विक्रमादित्य मोटवानी यांनी याआधी ‘लुटेरा’, ‘उडान’, ‘ट्रॅप्ड’ सारखे शिनेमे तयार केले आहेत.

स्रोत

सुपरहिरो जॉनर आपल्या देशात भरभरून चालतो पण त्यासाठी हॉलीवूडचे सुपरहिरो लागतात. आपल्याकडे अस्सल भारतीय सुपरहिरो फारच कमी तयार झाले. ‘भावेश जोशी’च्या ट्रेलर मधून थोडं वेगळेपण पाहायला मिळत आहे. कदाचित भारतीय सुपरहिरो परंपरेत हा सिनेमा धमाकेदार ठरेल. पण त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल.

 

आणखी वाचा : 

एका ‘न्यूड’ मॉडेलची कहाणी...ट्रेलर बघितला का ?

'धक धक गर्ल' माधुरीचा अखेर मराठीत सिनेमा येतोय, टीझर पाह्यलात की नाही ?

सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांचा नवीन कोरा सिनेमा...टीझर बघून घ्या राव

सबस्क्राईब करा

* indicates required