भाऊ कदम येतोय लिफ्टमॅनच्या रुपात....ट्रेलर बघून घ्या राव !!

Subscribe to Bobhata

मंडळी, भाऊ कदम म्हणजे हास्याचे फव्वारे. त्यांना तुम्ही फक्त हवा येउद्या मध्ये हसवताना पाहिलं असेल पण आता एका वेबसिरीज मधून ते आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांची नवीन वेबसिरीज येत आहे राव. नाव आहे लिफ्टमॅन.

लिफ्टमॅन म्हणजे एक प्रकारे लिफ्टचा ड्राईव्हरच असतो. आपल्याला हवं त्या मजल्यावर घेऊन जाण्याचं काम तो करत असतो. आता लिफ्टमॅन जर भाऊ कदम सारखा असेल तर धम्माल तर उडणारच. अशाच काही गमती जमती या वेबसिरीज मधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

मंडळी, लिफ्टमॅनला भेटण्यासाठी तुम्हाला झी५ वर जावं लागेल. आज पासून तो आपल्या भेटीला येतोय.

सबस्क्राईब करा

* indicates required