आता गोरं व्हायला पण डॉक्टरांची चिठ्ठी लागणार...का, ते जाणून घ्या राव !!

समस्त गावच्या समस्त  महिलांनो... सावधान !! सावधान !! सावधान !!

सरकारनं एक नवीन नियम काढलेला हाय. तुम्हाला जर गोरं व्हायचं असंल अन त्यासाठी फेअरनेस क्रीम घेत असाल, तर ते आता घेता येनार न्हाय. नवीन कायद्यापरमानं त्यासाठी आधी डॉक्टरची लेखी परवानगी घ्यावी लागंल. अन मगच फेअरनेस क्रीम घेता येईल.

स्रोत

आता का म्हणून काय इचारता?? त्याचं काय हाय ना, स्टेरॉईड आणि अँटीबायोटीक असलेली फेअरनेस क्रीम तुमच्या चेहऱ्याची पार वाट लावतात बघा. गोरं होन्याऐवजी सोन्यासारख्या तोंडावर बारीक पुरळ उठतात, त्वचा काळपट पडते, नाय तर चेहऱ्याला दुखापत होती. अशानं जे सौंदर्य हाय ते पन जाईल का नाय ? म्हनूनच सरकारने फतवा काढलाय की डॉक्टरांच्या परवानगी शिवाय अशा क्रीम घेता येणार न्हाय.

अशा क्रीम्सच्या सरसकट विक्रीवर आता बंदी आली हाय. जर का या कंपन्यांनी काही झोलझाल केला, तर कायदा त्यास्नी सोडणार नाय बघा. गोरं होन्यासाठी आता आपल्या चेहऱ्यावर प्रयोग करता येनार नाय. त्यासाठी कायदेशीर डॉक्टरांकडे जायचं अन तसं लिहून घ्यायचं. काय समजलं ?

राम राम!!