computer

या १० टिप्सने तुमचा स्मार्टफोन आणखी स्मार्ट करा !!

आपल्या जवळपास असा एकही माणूस सापडणार नाही जो स्मार्टफोन वापरत नाही. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या आणि स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढत आहेत. आणि त्याचवेळी स्मार्टफोन लवकर खराब होण्याचे प्रमाण पण वाढत आहे. पण मंडळी जर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुमचा फोन दीर्घकाळ चालू शकतो. स्मार्टफोन वापरणारे सगळेच स्मार्ट असतील असे नाही म्हणून आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याने तुमचा स्मार्टफोनचा वापर अजून स्मार्ट होईल.

चला तर मग जाणून घेऊया  काही टिप्स...

1) मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा फोन लवकर चार्ज करायचा असेल तर त्याला ऐरोप्लेन मोडवर टाका. त्यामुळे मोबाईल ट्रान्समीटर-रिसिव्हर बंद होऊन जाईल आणि तुमचा फोन पटकन चार्ज व्हायला लागतो.

2) मोबाईलचा वापर चार्जिंग करत असताना टाळावा. चार्जिंग करत असताना मोबाईल वापरल्यास मोबाईलची बॅटरी लाईफ कमी होऊन जाते. त्याचमुळे केबल वायर लहान दिलेले असतात. 

3) मोबाईलच्या बॅटरीला 6 इंच वरून फेका, जर बॅटरी थोडी बाऊन्स झाली याचा अर्थ बॅटरी चांगली आहे आणि जास्त बाऊन्स झाली तर समजून जा बॅटरी खराब होण्यात आहे.

4) जर तुम्ही pdf फाईल डाउनलोड करत आहात, आणि फाईलच्या शेवटी .exe आहे तर 99% शक्यता ती फाईल वायरस असण्याची असते. ती फाईल लगेच डिलीट करून टाका.

5) जर तुमचा फोन हँग झाला तर  त्याला चार्जिंगला लावून थोड्यावेळाने तुम्ही त्याला आधीसारखा नॉर्मल करू शकता.

6) मोबाईलची बॅटरी जास्त वेळ चालण्यासाठी मोबाईलला एखाद्या थंड ठिकाणी ठेवा.

7) जर तुम्ही ब्लूटूथचा वापर करत नसाल तर ते बंद करून टाका. ब्लूटूथ चालू ठेवणे तुमची बॅटरी कमी करू शकतो.

8) मोबाईल  कधीच पूर्ण 100% चार्ज करू नये. किंवा बॅटरी लो होऊन मोबाईल बंद पडेल एवढी कमी पण राहू देऊ नये. 

9) दुसऱ्याच्या चार्जरने फोन कधीच चार्ज करु नका. यामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते.

10) मोबाईल कुठेही ठेवताना सहसा कपड़े किंवा मऊ जागेवर ठेवावा त्याने मोबाईलचा डिस्प्ले खराब होण्यापासून वाचतो.

तर मंडळी, या होत्या काही टिप्स ज्यांनी तुम्ही मोबाईलचा वापर स्मार्टपणे करू शकता यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहित असतील तर काही माहित नसतील म्हणून तुमच्या मित्रांनी पण मोबाईलचा वापर स्मार्टली करावा म्हणून ह्या टिप्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required