भारतासाठी ‘राफेल’ महत्वाचं का आहे ? जाणून घ्या राफेल विमानाची १० प्रमुख वैशिष्ट्ये !!

लवकरच भारतीय वायुदलाच्या राफेल विमानांच्या चाचण्या सुरु होणार आहेत. या चाचण्या सुरु होण्यापूर्वीच राजकारणाच्या रंगमंच्यावर राफेल विमानांच्या खरेदी संदर्भात धुळवड सुरु झाली आहे. राजकारण हा आपला विषय नाही, आपण आज बघणार आहोत राफेल विमानांची अशी वैशिष्ट्ये जी वाचल्यावर राफेल का ? या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

सुरवातीला बघू या की आपल्या वायुदलाला राफेल विमानांची गरज का भासली ?

अनेक वर्षांपासून आपल्या वायुदलात मिग २१, मिग २७, सुखोइ ३०, ही रशियन बनावटीची विमाने वापरली जातात. या विमानांच्या वापराचे मुख्य कारण भारत रशिया मैत्री करार आणि एकूणच अमेरीकन असहकार होते. राव, रशियन विमानांची एक समस्या अशी होती की या विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठा फक्त रशियातून व्हायचा. दरम्यान २०१८ च्या शेवटी ही सगळीच्या सगळी विमाने आउटडेटेड होतील.

रशियन बनावटीची विमाने (स्रोत

सध्या वायुदलात ३१ स्क्वाड्रन (ताफा) आहेत. एका ताफ्यात १२ ते २४ इतकी विमाने असतात. येत्या दशकात वायुदलात ४२ स्क्वाड्रन अपेक्षित आहेत. इतर देशात लढाऊ विमाने Fifth Generation स्वरुपाची म्हणजेच अद्ययावत आहेत. इतकेच नव्हे तर चीन आणि अमेरीकेच्या सहकार्यातून पाकिस्तानकडे पण अमेरीकन F-16 आणि चीनची JF-17 ही Fifth Generation विमाने आहेत.

देशाच्या हवाई संरक्षणाची व्याप्ती किती मोठी आहे ते आधी वाचू या !!

पाकिस्तान आणि चीन या दोन शेजार्‍यांशी आपले संबंध फारसे सलोख्याचे नाहीत. या दोन्ही देशांच्या निकटचा सीमाभाग १५००० किलोमीटर लांबीचा आहे. त्याखेरीज समुद्रतटाची लांबी ७५०० किलोमीटर आहे. पाकिस्तानकडे २० ताफे आहेत. ज्यामध्ये ३५०/३६० विमाने आहेत. चीनकडे १७०० फायटर जेटचा ताफा आहे. युध्दसज्ज राहण्यासाठी भारताला ताफ्याची संख्या ४२ पर्यंत न्यायची आहे. 

आता वाचू या नव्याने दाखल होणार्‍या राफेलची खास वैशिष्ट्ये :

स्रोत

१. राफेल विमान हवेतल्या हवेत आणि हवेतून जमीनीवर अशा दोन्ही हल्ल्यासाठी वापरले जाऊ शकते. 
२. अण्वस्त्रसज्ज हल्ला करण्यासाठी राफेल उपयोगी आहे. 
३. ताशी २१३० किलोमीटरचा वेग हे विमान गाठू शकते. 
४. रनवेची लांबी कमी असली तरी हे सहज उड्डाण करू शकते. अगदी १५०० फूटाचा रनवे देखील पुरेसा असतो.
५. एक विमान ३७०० किलोमीटरच्या परीसरावर लक्ष ठेवू शकते. 

स्रोत

६. उड्डाण केल्यावर ६०००० फूट उंचीवर पोहचण्यास केवळ एक मिनीट लागते.
७. इंधन वाहून नेण्याची क्षमता तब्बल १५००० गॅलन आहे.
८. एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता या विमानात आहे. याखेरीज 3D इमेजींग मॅप असल्याने एकाच वेळी अनेक लक्ष्यवेध करण्याची सोय पण या विमानात आहे.
९. या विमानात प्राणवायु तयार करण्याची व्यवस्था असल्याने द्रव स्वरुपाय प्राणवायू नेण्याची गरज संपली आहे.
१०. हे विमान बनवणारी कंपनी जरी देशाबाहेर असली तरी या विमानांचे सर्व डिझायनींग भारतातच म्हणजे आपल्या पुण्यातच होते. सुरुवातीची काही विमाने तयार आली तरी बाकीची सर्व विमाने भारतातच तयार होणार आहेत. टाटांच्या काही कंपन्या या विमानाचे काही भाग बनवत आहेत.

मंडळी, भारत येत्या काही वर्षात लष्करी आयुधे तयार करणारा जगातील सर्वात मोठा तळ असेल असे विदेशी तज्ञांचे मत आहे. राफेल विमाने भारतात उत्पादीत होणे ही कदाचित त्या दिशेचे पहिले पाऊल असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required