f
computer

फोर्ब्स २०१८ : या आहेत जगातल्या १० वजनदार व्यक्ती....बघा यादीत कोण कोण सामील आहे!!

फोर्ब्सची प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. दरवर्षी फोर्ब्सतर्फे प्रत्येकी १० कोटी लोकांमागे १ व्यक्तीची निवड सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून केली जाते. सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, इत्यादी क्षेत्रात आपल्या कामाने दबदबा निर्माण करणारी ही व्यक्ती असते. जगाच्या एकूण ७.५ अब्ज लोकसंख्येपैकी ७५ लोकांना यात स्थान मिळतं.

यावर्षी देखील फोर्ब्सने जगातील ७५ शक्तिशाली लोकांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत भारताची २ नावे सामील आहेत. पहिलं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरं म्हणजे मुकेश अंबानी यांचं. दोघांपैकी नरेंद्र मोदी १० पैकी ९ व्या स्थानावर आहेत तर मुकेश अंबानी ३२ व्या क्रमांकावर आहेत.

मंडळी या ‘वजनदार’ व्यक्तीमत्वांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग. त्यांनंतर नंबर लागतो रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा.

मंडळी, जगातील १० प्रभावशाली व्यक्तींची यादी अशी आहे बरं...

१. शी जिनपिंग

चीनचे अध्यक्ष

२. व्लादिमिर पुतिन

रशियाचे अध्यक्ष

३. डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष

४. एंजेला मार्केल

जर्मनीच्या चान्सलर

५. जेफ बेजोस

अमेझॉनचे संस्थापक

६. पोप फ्रान्सिस

ख्रिश्चन धर्मगुरु

७. बिल गेट्स

बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे संस्थापक

८. मोहम्मद बिन सलमान अल सौद

सौदी अरेबियाचा युवराज

९. नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान

सबस्क्राईब करा

* indicates required