हातांविना जन्मलेल्या या १० वर्षांच्या मुलीने हस्ताक्षर स्पर्धेत पूर्ण देशात पहिला नंबर मिळवलाय!!

आज आम्ही जो किस्सा सांगणार आहोत तो वाचून अशक्य असं काहीच नसतं यावर तुमचा विश्वास बसेल. अमेरिकेत झालेल्या एका हस्ताक्षर स्पर्धेत एका जन्मतःच हात नसलेल्या मुलीने पहिला क्रमांक मिळवला आहे. आहे की नाही प्रेरणादायी ??

स्रोत

या मुलीचं नाव आहे सारा हिंसले. तिला जन्मतःच हात नाहीत. ती लिहिण्यासाठी दोन्ही हातांच्या मध्ये पेन्सिल धरते. तिच्यातली ही कमतरता तिला कधीच त्रासदायक ठरली नाही. ती सहज लिहू शकते, चित्र काढू शकते. नुकतंच अमेरिकेत एक राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती. तिने या स्पर्धेत सर्वांना मागे टाकून पहिला नंबर पटकावला आहे. बक्षीस म्हणून तिला ५०० डॉलर्स (३५,०००) पण मिळाले आहेत.

आश्चर्य म्हणजे साराला स्वतःच्या यशाबद्दल फारसं कौतुक वाटत नाही, कारण ती म्हणते की मी काही वेगळं केलेलं नाही. तिच्या शिक्षकांनी म्हटलंय की ती शारीरिक व्यंगामुळे कधीच मागे राहिलेली नाही.

स्रोत

मंडळी, सारा मुळची चीनची आहे. ती ४ वर्षापूर्वी अमेरिकेत आली. तेव्हा तिला मँडेरिन भाषेखेरीज कोणतीच भाषा येत नव्हती, पण तिने लवकरच इंग्रजी आत्मसात केली. आता तिने इंग्रजी आणि मँडेरिन या दोन्ही भाषांमध्ये प्रभुत्व मिळवलं आहे.

मंडळी, साराकडून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे. तिच्या जिद्दीला सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required