f
computer

या ११ गोष्टी खोट्या आहेत असं तुम्हांला नक्कीच वाटत नसेल, पण जरा पाहा बरं...

आपण लहानपणापासून काही चुकीच्या समजुती खऱ्या समजून जगत आलेलो आहोत. या समजुती आपल्या डोक्यात इतक्या घट्ट बसल्या आहेत की आपण त्यांच्या खरेपणाबद्दल कधी संशय देखील घेतला नाही. किंबहुना त्या खऱ्या आहेत हे आपण गृहीत धरूनच चाललो आहोत. पण आता या समजुतींना खोडून काढण्याची वेळ आलेली आहे राव.

चला तर पाहूयात त्या समजुती आहेत तरी कोणत्या ?

१. आपण मेंदूचा फक्त १० % वापर करतो.

मंडळी, हे आपण शाळेतून शिकत आलेलो आहोत. म्हणे आईनस्टाईन तात्या जास्तीत जास्त मेंदू वापरायचे म्हणून ते वैज्ञानिक होते. पण आपण तर तेवढा पण नाही वापरात. खरं तर मेंदू वापरण्याचं या प्रकारचं कोणतंही प्रमाण नसतं. या म्हणण्याचा फक्त एवढाच अर्थ होतो की आपण मेंदू कमी वापरतो.

२. पाठदुखीवर उपचार म्हणून झोपून राहिलं पाहिजे.

राव, पाठदुखीचा त्रास असल्यास तुम्ही बेडरेस्ट बरोबरच रोजची कामे सुद्धा केली पाहिजेत. फक्त बेडरेस्ट केल्याने हा त्रास कमी होणारा नसतो. रोजची कामे केल्याने बऱ्याच दुखणे कमी होण्यास मदत होते.

३. च्विंगम गिळल्यानंतर तो आपल्या पोटात ७ वर्ष राहतो

च्विंगम पचनास जड असलं तरी शरीर त्याला विष्ठेवाटे बाहेर काढू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की च्विंगम खाताना काळजी घेतली नाही पाहिजे.

४. तुम्ही दिवसातून ८ ग्लास पाणी प्यायला पाहिजे.

शरीरास एका दिवसात २.५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. तुम्ही हे पाणी जेवणातून आणि सरबत किंवा इतर पेयातून शरीरास पुरवू शकता. त्यासाठी मोजून ८ ग्लास पाणी पिण्याची गरज नसते.

५. तिखट खाल्ल्याने अल्सर होतो

अल्सरचं मुख्य कारण हे ‘Heliobacter pylori’ हा बॅक्टेरिया असून त्याचा तिखट अन्नाशी कसलाही संबंध नाही.

६. मासिक पाळीदरम्यान गर्भधारणा होऊ शकत नाही.

मासिक पाळी संपल्यानंतर किंवा पाळी दरम्यान गर्भधारणा होऊ शकते हे वैज्ञानिक परीक्षणातून सिद्ध झालेलं आहे.

७. केस आणि नखांची वाढ मृत्युनंतरही होत राहते.

मृत्युनंतर त्वचा आक्रसून जाते त्यामुळे केस आणि नखे जास्त स्पष्ट दिसू लागतात. त्यामुळे बघताना त्यांची वाढ होत आहे असा भास होतो.

८. दाढी केल्यानंतर दाढी लवकर वाढते व ती आधी पेक्षा जास्त काळी होते.

दाढी केल्यानंतर केसांचे खुंट हे त्वचेच्या रंगाच्या विरुद्ध असल्याने उठून दिसतात. आणि आपल्याला असा भास होतो की त्यांचा रंग जास्त गडद झाला आहे. दाढी केल्यानंतर काहीकाळाने हा गडदपणा दिसून येत असल्याने केस जलद गतीने वाढतायत असाही भास होतो. पण खरं तर केस वाढणे ही नियमित प्रक्रिया आहे.

९. सप्लीमेंट घेतल्याने डोले-शोले वाढतात !!

सप्लीमेंट घेऊन शरीर सुदृढ बनवण्याची स्वप्न आपण पाहतो. खरं तर या सप्लीमेंट्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. वैद्यकीय सल्ल्याशिवाय सप्लीमेंट घेऊ नयेत.

१०. अपरात्री जेवल्याने वजन वाढतं !!

राव, रात्री बेरात्री जेवल्याने वजन वाढत नाही. पण तुम्ही कोणतं अन्न घेताय यावर वजन वाढणं नक्कीच अवलंबून आहे.

११. चॉकलेट आणि तळलेल्या पदार्थांनी चेहऱ्यावर मुरूम उठतात.

चेहऱ्यावर मुरूम उठण्याचं मुख्य कारण हे हार्मोन्स असतात. काहीवेळा ताणतणाव आणि अनुवांशिक कारणांनी सुद्धा मुरूम उठू शकतात पण याचं कारण चॉकलेट आणि तळलेले पदार्थ नक्कीच नाहीत.

सबस्क्राईब करा

* indicates required