राव, या दुकानात रजनी आण्णाला पाहायला होते त्याहून जास्त गर्दी झाली ना हो...

फर्निचर उत्पादनातली अग्रगण्य कंपनी आयकियाने भारतात पाहिलं दुकान थाटलंय. हे दुकान हैद्राबाद मध्ये उघडलं असून त्याला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. याचा अंदाज येण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा.

राव व्हिडीओवरून तर असं वाटतंय की रजनीकांत आलाय म्हणून एवढी गर्दी उसळली आहे. पण ही गर्दी आहे आयकिया मध्ये शॉपिंगला आलेल्या माणसांची. तब्बल ४०,००० लोक पहिल्याच दिवशी आले होते भाऊ.  ही अलोट गर्दी सांभाळता सांभाळता आयकियाच्या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले राव. 

हे तर काहीच नाही राव. थांबा तुम्हाला दुकानं बाहेरचा नजारा दाखवतो.

 

बाहेर भली मोठ्ठी ट्राफिक दिसतेय राव. ही ट्राफिक एवढी वाढली की शेवटी ट्राफिक पोलिसांना ट्राफिक हाताळण्यासाठी विशेष सूचना देण्यात आली. सूचनेत स्पष्ट म्हटलंय की आयकिया स्टोर मध्ये ६५० गाड्या पार्क करण्याची जागा असून कोणीही दुकानाबाहेर गाडी पार्क करणार नाही याची खबरदारी घ्यावी.

या सूचना नागरिकांसाठी सुद्धा होत्या. नागरिकांना बजावण्यात आलं होतं की कोणीही रिक्षा किंवा कॅबसाठी ट्राफिक मध्ये शोधाशोध करू नये. त्यांनी ठरवलेल्या जागेवरच उभं राहावं. एवढं करूनही व्हायचा तो ट्राफिक जाम झालाच. 

राव, एवढ्या मोठ्या गर्दीला बघून ट्विटरवर एकाने म्हटलंय, ‘सगळ्या श्रीमंतानी आपापल्या कार्पेंटर मंडळींना फर्निचर उचलण्यासाठी पाठवलंय.’

 

बरं, एवढी गर्दी झाली म्हणजे खूप विक्री झाली असेल असं वाटलं असेल ना तुम्हांला ?? हा पाहा आमच्याकडे एक फोटो आलाय...

राव, आयकियावाल्यांचा पहिल्या दिवसाचा टार्गेट तब्बल ३ कोटी २० लाखाचा होता. पण विक्री झाली फक्त ९५ लाखांची. राव, पहिल्याच दिवशी ह्या लोकांनी जरा जास्तंच अपेक्षा ठेवल्या होत्या नाही का ? हे म्हणजे, खरेदी करणाऱ्यांपेक्षा बघ्यांचीच गर्दी जास्तं झाली !!

सबस्क्राईब करा

* indicates required