गेल्या ५ वर्षात भारतीय सुरक्षा दलावर झालेले ६ मोठे दहशतवादी हल्ले !!

काल पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या गोरीपोरा येथे झालेल्या एका भ्याड हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. उरी हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला म्हणून याकडे बघितलं जात आहे. गेल्या २ दशकांचा काळ बघितला तर आपल्याला लक्षात येईल की या प्रकारचे जवळजवळ २० पेक्षा जास्त मोठे हल्ले भारतीय सुरक्षा व्यवस्थांवर झालेले आहेत. गेल्या ५ वर्षात उरी भागातच असे २ मोठे हल्ले झाले आहेत. अशा वारंवार होणाऱ्या हल्ल्यावर उपाय काय ? तर त्यासाठी आपली सुरक्षा व्यवस्था नक्कीच तेवढी खंबीर आहे.

आज आपण वाचणार आहोत ५ वर्षातील भारतीय सुरक्षा व्यवस्थेवर झालेल्या हल्ल्यांबद्दल. चला तर एक नजर टाकूया.

स्रोत

२६ ऑगस्ट, २०१७

‘जैश-ए-मोहम्मद’ने काल सारखाच हल्ला पुलवामाच्याच पोलीस लाईनवर केला होता. या हल्ल्यात ३ दहशदवाद्यांना मारण्यात आलं. या चकमकीत भारताने ८ जवान गमावले होते.

 

२९ नोव्हेंबर, २०१६

जम्मूच्या नगरोटा भागात २०१६ साली हा हल्ला झाला होता. ३ दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. दुर्दैवाने ७ जवान शहीद झाले होते.

स्रोत

 

१८ सप्टेंबर, २०१६ 

हा तोच हल्ला आहे ज्या हल्ल्याने भारतावर सर्जिकल स्टाईक करण्याची वेळ आणली. या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. जवान झोपेत असताना दहशतवाद्यांनी भ्याडपणे हल्ला केला होता. या सर्व दहशतवाद्यांना नंतर कंठस्नान घालण्यात आलं.

स्रोत

 

२५ जून, २०१६

श्रीनगरच्या पंपोर येथील CRPF च्या बसवर दहशदवाद्यांनी अंधाधून गोळीबार केला होता. या हल्ल्यात ८ जवान शहीद झाले होते.

स्रोत

 

३ जून, २०१६

२५ जून पूर्वी झालेला या हल्ल्यात पण अंधाधून गोळीबार झाला होता. या हल्ल्यात २ जवानांवर हल्ला झाला व त्यानंतर दहशतवादी एका सरकारी इमारतीत जाऊन लपले. २ दिवसांच्या एन्काऊंटर मध्ये दोन्ही  दहशतवादी मारले गेले पण ३ जवान आणि एका नागरिकाला पण प्राण गमवावा लागला.

 

५ डिसेंबर. २०१४

या हल्ल्यात सामील दहशदवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. उरीच्या मोहरा भागातल्या आर्मी कॅम्पवर हा हल्ला झाला होता. १० जवान दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आले होते. चकमकीत शेवटी सर्व दहशतवाद्यांना मारण्यात आलं.

स्रोत

 

मंडळी, हे सर्व हल्ले बघितले तर लक्षात येईल शेवटी भारतीय सैन्याने प्रत्येक दहशतवाद्यांला टिपून मारलं आहे, पण असं असलं तरी हे हल्ले थांबायला पाहिजेत, याचा नक्कीच अंत झाला पाहिजे. सर्व शहिदांना बोभाटातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

सबस्क्राईब करा

* indicates required