f
computer

भारतातल्या नव्या सर्वात पॉवरफुल रेल्वे इंजिनबद्दलच्या या ६ गोष्टी माहीत आहेत का ?

नरेंद्र मोदींनी नुकतच भारतातल्या पहिल्या सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिनला हिरवा कंदील दिला आहे. दिल्ली ते कटिहारी दरम्यान ‘हमसफर एक्स्प्रेस’ नावाची नवी रेल्वे धावणार आहे आणि या रेल्वेमध्ये आजवरचं सर्वात शक्तिशाली इंजिन बसवण्यात येणार आहे. सध्या तरी या इंजिनचा वापर ‘हमसफर एक्स्प्रेस’साठी करण्यात येणार असला, तरी भविष्यात तो आणखी गाड्यांमध्ये दिसून येईल.

हे इंजिन शक्तिशाली का आहे हे जाणून घेऊया खालील ६ मुद्द्यांवरून !!

१. आजवर भारतातील शक्तिशाली इंजिन म्हणून ६००० हॉर्सपॉवरच्या इंजिनकडे बघितलं जायचं. पण आता हे रेकोर्ड मोडलंय. हे नवीन इंजिन तब्बल १२००० हॉर्सपॉवरचं असणार आहे.

२. फ्रेंच कंपनी Alstom सोबत मिळून मधेपुरा कारखान्यात हे इंजिन तयार करण्यात आलंय आणि या प्रोजेक्टवर ३५ इंजिनियर्सची टीम काम करत होती.

३. १२००० हॉर्सपॉवरच्या इंजिनमुळे आपण चीन, जर्मनी, रशिया यांच्या पंक्तीत जाऊन बसलो आहोत.

४. या इंजिनचा स्पीड किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. या इंजिनमुळे रेल्वे ताशी ११० किलोमीटर च्या स्पीडने धावू शकणार आहे.

५. या प्रोजेक्टवर तब्बल २०,००० कोटींचा खर्च करण्यात आलाय आणि पुढील ११ वर्षात या प्रकारचे ८०० इंजिन तयार करण्यात येणार आहेत.

६. या इंजिनचा सर्वात मोठा फायदा मालगाड्यांना होणार आहे. आज मालगाडी ताशी २५ ते ३० किलोमीटरच्या गतीने धावते, पण भविष्यात ती १०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगात धावेल.

मंडळी या शक्तिशाली इंजिनमुळे भारतीय रेल्वेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला यात शंका नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required