या मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय?

तू अमुक अमुक परीक्षा पास हो मग तुला तमुक तमुक घेऊन देतो – हे प्रत्येक घरातलं वाक्य... मुलांना त्यांना हवं ते देण्यासाठी आधी परीक्षा पास हो म्हटलं जातं. हनिफा झारा या ७ वर्षाच्या मुलीला तिच्या वडिलांनी असंच एक प्रॉमिस दिलं होतं. पण ते प्रॉमिस पूर्ण करू शकले नाही. मग हनिफाने थेट पोलीस स्टेशन गाठलं. काय होती तिची मागणी ? चला जाणून घेऊ.

स्रोत

तामिळनाडूच्या अम्बुर येथे राहणाऱ्या हनिफा झारा हिला तिच्या वडिलांनी म्हटलं होतं - ‘तू जर वर्गात पहिली आली तर मी तुझ्यासाठी घरात शौचालय बांधीन...’ या गोष्टीला २ वर्ष झाली. हनिफाने वर्गात पहिला नंबर काढला, पण वडिलांनी त्यांचं प्रॉमिस काही पूर्ण केलं नाही. मग हनिफाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुरावे म्हणून तिने आपल्याकडचे २० मेडल्स आणि सर्टिफिकेट्स पोलिसांपुढे सादर केले होते.

वडिलांनी तिची इच्छा का पूर्ण केली नाही ?

यामागे आर्थिक परिस्थिती हे एकमेव कारण होतं. हनिफाचे वडील रामेश्वरम येथे वेटर म्हणून काम करत होते, पण सध्या त्यांचं काम सुटलं आहे. ते कसेबसे घर चालवतात. त्यांच्या घरात अजून वीज सुविधा नीट पोहोचलेली नाही. हनिफाने तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या वडिलांना तातडीने बोलावण्यात आलं तेव्हा त्यांनी आपली बाजू मांडली.

स्रोत

मंडळी, मुलीने आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली याबद्दल वडिलांना राग आला असावा असं तुम्हाला वाटतं ना ? पण हनिफाच्या वडिलांना तिचा अभिमान वाटत आहे. ते म्हणाले की आपणच तिला ‘कधी काही संकट आलं, तर पोलिसांकडे तक्रार कर’ असं सांगितलं होतं.

पण शेवटी हे ज्यामुळे घडलं त्या शौचालयाचं काय ? तर, ती समस्या आता सुटली आहे. पोलिसांनी स्वच्छता अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली असून लवकरच हनिफासाठी शौचालय बांधून पूर्ण होईल.

 

आणखी वाचा : 

११ टॉयलेट एटीकेट्स खास पुरुषांसाठी !!

बिल गेटस यांनी 'शी'ने भरलेली बरणी स्टेजवरून का दाखवली ??

अशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था !!

जगभरातले २० अतरंगी टॉयलेट्स - ७ नंबर वर जे आहे ते आपल्या सर्वांसाठी आहे राव !!

जपान मधील 'टॉयलेट गॉड' !!

सबस्क्राईब करा

* indicates required