मोदक देणारे ATM मशीन...पाहा बरं महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरात आहे हे मशीन !!

पूर्वी ATM मशीनमधून फक्त पैसे निघायचे. आता अशा मशीन्स तयार झाल्या आहेत, ज्या दिसतात तर ATM मशीनसारख्या, पण त्यातून निघतं भलतंच. शिकागोमध्ये केक विकत घेण्यासाठी अशीच मशीन तयार करण्यात आली आहे. चीनमधल्या एका ATM मशीनमधून तर चक्क खेकडे बाहेर पडतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील.

मंडळी, आज अशा मशीन्सची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे ‘एनी टाइम मोदक’ मशीन. पुण्यातल्या सहकार नगर भागात ‘एनी टाइम मोदक’ (ATM) मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनमध्ये एक विशिष्ट कार्ड स्वाईप केलं की आतून एक डबी बाहेर पडते. या डबीत बाप्पाचा प्रसाद ‘मोदक’ असतो. याचं प्रात्यक्षिक बघायचं असेल तर हा व्हिडीओ बघा :

राव, ही मशीन हुबेहूब ATM मशीनसारखीच दिसते. फरक इतकाच की ATM मशीनमध्ये जिथे क्रमांक असतात त्याजागी क्षमा, सदाचार, प्रेम, भावना, सुख, निष्ठा, मोद, भक्ति या सारखे शब्द लिहिलेले आहेत.
या अनोख्या मशीनला तयार केलंय संजीव कुलकर्णी यांनी. त्यांनी म्हटलंय की तंत्रज्ञान आणि संस्कृती यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. 

राव, तुम्ही जर पुण्याला जाणार असाल किंवा पुण्यातच असाल, तर या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि हो सेल्फी पाठवायला विसरू नका...काय ?

गणपती बाप्पा मोरया !!

सबस्क्राईब करा

* indicates required