computer

व्हिडीओ ऑफ दि डे : १२४ देशातील लोकांनी गायलेले भजन 'वैष्णव जन तो'...

या सर्वांगसुंदर व्हिडीओबद्द्ल लिहायला थोडा उशीरच झाला आहे. उशीर झाला अहे असंही म्हणण्यात अर्थ नाही, कारण गेल्या महिन्याभरात एकाही व्हॉट्सॅप मेसेजमधून हा व्हिडीओ आमच्यापर्यंत फॉरवर्ड झालेला नाही. चला, देर आये लेकीन दुरुस्त आये असं म्हणा किंवा उशीरा सुचलेलं शहाणपण म्हणा, काही म्हणा..  पण या व्हिडीओचा आनंद घ्यायला तुम्ही मात्र उशीर करू नका.

 

१२४ देशातील अनेक गायकांनी 'मेडली' स्टाइलने गायलेले हे गीत महात्मा गांधींना आवडणार्‍या काही भजनांपैकी एक भजन आहे. गुजरातचे संत नरसी मेहेता यांची ही रचना आहे. २०१९ मध्ये महात्मा गांधींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण होतील.

देशोदेशीच्या गायकांना संपर्क करून, त्याच्या स्थानिक गायनशैलीचा वापर करून हे भजन चित्रित करण्यात आले आहे आणि सर्व वेगवेगळ्या तुकड्यातील अविष्कार एकत्रित करून पाच मिनीटाचा हा व्हिडीओ बनवण्यात आलेला आहे. केवळ गायकच नव्हे तर नोउरुच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतः गाऊन यात सहभाग घेतला आहे. 

अतिशय सुंदर व्हीडीओग्राफी,  श्रवणीय संगीत रचना आणि अप्रतिम संपादन याचा त्रिवेणी संगम जर पहायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा !!

सबस्क्राईब करा

* indicates required