computer

आता बँका प्रत्येक शनिवारी बंद राहतील ? खरंखोटं काय ते आत्ताच जाणून घ्या!!

मंडळी, आज आम्ही सोशल मिडिया विद्यापीठात फिरणारा एक मेसेज घेऊन आलो आहोत. हा मेसेज सांगतो की ‘१ जून’ पासून सर्व बॅंका प्रत्येक शनिवारी बंद राहतील. रिझर्व बँकेने आठवड्यातील ५ दिवस काम करण्याच्या पद्धतीला मान्यता दिली आहे.

हा मेसेज खरा आहे का ??

मंडळी, या मेसेजनुसार जर बँकांना ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी मिळत असेल तर इतर क्षेत्रांना का नाही ? बँकेच्या उदाहरणावरून हा प्रश्न विचारण्यात आला आहे, पण खरं तर हा मेसेज खोटा आहे. सुरुवातच बघा ना, ‘१ जून’ असा उल्लेख आहे, पण वर्ष ? त्याचा तर पत्ताच नाही.

एप्रिल २०१७ पासून या प्रकारचा मेसेज सोशल मिडीयावर फिरतोय. नुकताच पुन्हा एकदा तो व्हायरल झालाय. लोकांनी अर्थातच तो मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला आहे. या मेसेजमुळे बँकांची डोकेदुखी वाढलीय राव. लोक त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.

मंडळी, रिझर्व बँकेने २०१५ साली सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या बॅंका या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतील. हाच नियम आजही पाळला जात आहे आणि नियम बदलेल अशी शक्यता दिसत नाहीय.

यानिमित्ताने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या मेसेजला एक आधार आहे. बँकेचे युनियन आणि कर्मचारी शनिवारच्या राजेबद्दल फार पूर्वीपासून मागणी करत आहेत. आजही ती मागणी मान्य झालेली नाही.

तर, सोशल मिडीयावर फिरणाऱ्या या मेसेजचा एकंच उद्देश दिसतोय. या लोकांना ५ दिवसाच्या कामाची पद्धत आणायची आहे, पण हे पटवून देण्यासाठी खोटं बोलणं पटत नाही राव.  

सबस्क्राईब करा

* indicates required