शेवटच्या दिवशी हा इंजिनिअर चक्क घोड्यावर बसून अॉफीसला गेला!!

 

शहरांमध्ये ट्राफिकची समस्या काही नवीन नाही भाऊ. आणि दिवसेंदिवस ती कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतीये. या सतत वाढणार्‍या ट्राफिकच्या समस्येचा विरोध करायचा म्हणून एक इंजिनिअर चक्क घोड्यावर बसून अॉफीसला गेलाय राव!

बंगळूरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणार्‍या रूपेश कुमार वर्मा नावाचा हा तरूण आता इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय. फॉर्मल कपडे घालून, खांद्याला बॅग लटकवून तो घोड्यावर बसला होता. या घोड्यावर Last Working Day As Software Engineer (सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करण्याचा माझा शेवटचा दिवस) अशी पाटीही त्याने लावली होती. त्याने आपली इंजिनिअरची नोकरी सोडून स्वतःची सॉफ्टवेअर फर्म सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. रूपेशच्या या घोडेसवारीला मिळालेली प्रसिध्दी पाहून खुद्द रूपेशही आश्चर्यचकित झालाय.

स्त्रोत

सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं रूपेश सांगतो. मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची काळजी करत नाहीत. इथल्या कर्मचाऱ्यांना सतत दबावाखाली काम करावं लागतं. तणाव आणि निराशेतून अनेक कर्मचारी चुकीचा मार्ग निवडतात. अशी अनेक कारणं आपल्या नोकरी सोडण्यामागं असल्याची तो सांगतो. विशेष म्हणजे खास ट्रॅफिकजॅमच्या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने घोडेस्वारी शिकली आहे.

मग, तुम्ही काय उपाय शोधलाय ट्रॅफिक जॅमच्या वाढत्या समस्येवर??

सबस्क्राईब करा

* indicates required