काय बोलता ? चीन चक्क 'कृत्रिम चंद्र' बनवणार आहे ? जाणून घ्या या मागचं कारण !!

राव, चायनीज लोग कोणता ‘डुप्लीकेट माल’ बनवतील याचा काहीच नेम नाही. आता त्या लोकांनी चक्क स्वतःचा ‘चंद्र’ बनवण्याचं ठरवलंय. स-च्वान प्रांतातल्या “छेंडू” नावाच्या शहरात हा कृत्रिम चंद्र बनवण्यात येणार असून २०२० पर्यंत स-च्वान प्रांतात दोन दोन चंद्र दिसतील राव.

चायनीज लोकांना नवीन चंद्राची गरज का पडली याच कारण जाणून घेऊया !!

स्रोत

असं म्हटलं जात आहे की नैसर्गिक चंद्राच्या ८ टक्के जास्त प्रकाश कृत्रिम चंद्रातून परावर्तीत केला जाईल. नैसर्गिक चंद्र प्रकाशाला पूरक असा हा प्रकाश असेल. यामुळे होणार असं की रस्त्यावरील दिव्यांचा खर्च वाचणार आहे. स-च्वान प्रांतातील जवळजवळ ८० किलोमीटरच्या भागात या कृत्रिम चंद्राचा प्रकाश पसरेल. हा चंद्र किती मोठा असेल, त्याचं वजन किती असेल, नक्की किती प्रकाश परावर्तीत केला जाईल याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. कृत्रिम चंद्र संपूर्ण चीन मधून पाहता येणार आहे.

मंडळी, वैज्ञानिकांचा मात्र कृत्रिम चंद्राला विरोध आहे. वन्य जीवांवर कृत्रिम चंद्र प्रकाशाचा विपरीत परिणाम होतो असं विज्ञान म्हणतं. काही प्राणी हे प्रकाशाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतात. अशा प्राण्यांना याचा फटका बसू शकतो. आता चीन यातून काय मार्ग काढणार हे बघण्यासारखं असेल. 

मंडळी, रशियाने अशाच प्रकारचा प्रयत्न १९९० साली केला होता. ‘solar reflecting system’ (सौर परावर्तन प्रणाली) - ‘स्पेस मिरर’ असा हा प्रकल्प होता. याद्वारे जवळजवळ ३ ते ५ चंद्रांचा प्रकाश एकत्रितपणे तयार होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. पण काही कारणांनी हा प्रकल्प बंद पडला.

 

आणखी वाचा :

तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी उजळवलं सहा महिने अंधारात बुडणारं गाव !!

सबस्क्राईब करा

* indicates required