ब्रेकअपसाठी तिने मागितले तब्बल एवढे पैसे ? रक्कम बघून तुमचा विश्वास बसणार नाही !!

ब्रेकअप करण्यासाठी पैसे मागितल्याचं कधी ऐकलंय का राव ? नसेल ऐकलं तर चीनची ही घटना बघा. चीन मधल्या झेझियांग प्रांतात राहणाऱ्या एका मुलाकडून त्याच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअपच्या बदल्यात तब्बल ५ कोटी मागितले आहेत. चला जाणून घेऊया हा काय प्रकार आहेत ते.

६ मे रोजी रात्री १० वाजता २ मुली एका बार गेल्या. दोघी बार मध्ये पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात एक मुलगा तिथे आला. त्याच्या हातात एक बॅग होती. तिघांमध्ये बोलणं सुरु झालं. पण अचानक या बोलण्याची जागा भांडणाने घेतली. हे भांडण वाढल्यानंतर तो मुलगा बॅग तिथेच ठेवून निघून गेला. थोड्यावेळाने त्या दोघी सुद्धा निघून गेल्या. पण त्यांनी बॅग आपल्या सोबत नेली नाही.

स्रोत

बार बंद करत असताना बारच्या कर्मचाऱ्यांना ही बॅग सापडली. त्यात असलेला पैसा बघून बारच्या मॅनेजरने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी सुटकेस मधील रक्कम मोजली. ती रक्कम तब्बल २ कोटी रुपये होती.
दुसऱ्याच दिवशी मुलगा बार मध्ये आला. त्याने सुटकेस बाबत विचारणा केली असता बारच्या स्टाफकडून पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलीसांनी या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावलं. त्यावेळी मुलाने ही बॅग आणि त्यातील रक्कम आपली असल्याचा दावा केला. 

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही बॅग त्याचीच असल्याचं सिद्ध झालं. यांनतर त्याने संपूर्ण गोष्ट सांगितली. तो २३ वर्षांचा असून आयटी इंडस्ट्रीत काम करतो. त्या दोघींपैकी एक त्याची गर्लफ्रेंड होती. काहीच दिवसापूर्वी त्यांच्यात ब्रेकअप पर्यंत गोष्टी गेल्या होत्या. पण हे ब्रेकअप त्याला महागात पडणार होतं. तिने त्याच्याकडे चक्क ‘ब्रेकअप फी’ मागितली. ही फी तब्बल ५ कोटी रुपये एवढी होती. पण त्याने फक्त २ कोटी दिले. म्हणून ती रागावली आणि बॅग तिथेच सोडून निघून गेली.

पोलिसांनी या मुलाला दम देऊन सोडून दिलं आहे आणि त्याचे पैसे सुद्धा त्याला परत केलेत. 

एक प्रश्न तर अनुत्तरीतच राहिला ना राव. ‘त्या मुलीने ब्रेकअपसाठी पैसे का मागितले असावेत ??

 

आणखी वाचा :

फेसबुकने आणलं डेटिंग अँप, आता मेसेंजरमध्ये j1 झालं का विचारायची गरज नाही ना भाऊ !!

सबस्क्राईब करा

* indicates required