फ्री वायफायच्या वापरातून या पठ्ठ्याने काय केलंय बघा !! तुम्ही विचार सुद्धा केला नसेल !!

आज भारतातल्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर फ्री वायफाय उपलब्ध आहे. या फ्री वायफायच्या मदतीने लोकांना एक रुपयाही न मोजता 4G च्या स्पीडने इंटरनेट वापरता येतो. या मोफत सेवेचा खरा फायदा घेतलाय एर्नाकुलमच्या एका पठ्ठ्याने. या तरुणाने फ्री वायफाय वापरून लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होण्याची कामाल केली आहे.

राव, या तरुणाचं नाव आहे के श्रीनाथ. तो एर्नाकुलम स्थानकावर हमाल म्हणून काम करतो. कामातून वेळ काढून त्याने आपल्या परीक्षेकडे लक्ष दिलं. त्याने स्टेशनवरील वायफाय वापरून परीक्षेच्या तयारीचे व्हिडीओ पाहिले, प्रश्नपत्रिका सोडवल्या, अभ्यासाच्या संबंधित लेख वाचले. अशा प्रकारे त्याने आपली तयारी पूर्ण केली.

स्रोत

तीन वेळा केपीएससीची (लोकसेवा आयोग) परीक्षा दिल्यानंतर यावेळी तो उत्तीर्ण झाला आहे. तो गेल्या ५ वर्षापासून कुलीचं काम करतोय. जर तो इंटरव्ह्यू पास झाला तर त्याचं आयुष्य बदलून जाईल.

राव, आपण फ्री वायफायचा वापर सोशल मिडिया, युट्युब, गाणी इत्यादीसाठी करतो पण के श्रीनाथने त्याचा वापर जसा केला ते खरच कौतुकास्पद आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required