रोजा तोडला म्हणून या मुस्लीम बांधवाची होतेय प्रशंसा....कारण वाचून तुम्हीसुद्धा मान्य कराल !!

रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधवांकडून उपवास (रोजा) केला जातो. सूर्योदयानंतर अन्नाचा एक कणही खाल्ला जात नाही. एवढंच काय थुंकी सुद्धा गिळली जात नाही. पण एका मुस्लीम बांधवाने हा नियम तोडला आहे आणि त्यासाठी त्याची सगळीकडून प्रशंसा होत आहे. हे कारण ऐकून तुम्ही सुद्धा त्याची तारीफ कराल राव.

त्याने कोणत्या कारणासाठी आपला रोज तोडला ? चला जाणून घेऊया !!

स्रोत

अजय बिजल्वाण नावाचा व्यक्ती यकृतातील संक्रमणाने आयसीयूमध्ये दाखल झाला होता. त्याच्या शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची संख्या वेगाने कमी होत चालली होती. धोक्याची सूचना तर तेव्हा मिळाली जेव्हा या प्लेटलेट्सची संख्या ५००० पेक्षा कमी झाली. त्याला रक्त देणं गरजेचं होतं. पण त्याचा रक्तगट A+ असलेलं रक्त कुठेही मिळालं नाही. हे रक्त मिळालं नाही तर जीवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले.

शेवटचा उपाय म्हणून अजयच्या वडिलांना त्याच्या नातेवाईकांनी मदतीसाठी सोशल मिडीयाचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे अजयच्या वडिलांनी सोशल मिडीयावर मदत मागितली. ही बातमी जाऊन पोहोचली देहरादूनचे ‘नॅशनल असोसिएशन फॉर पॅरेंट्स अँड स्टूडंट्स राइट्स’चे अध्यक्ष आरिफ खान यांच्या पर्यंत. त्यांनी लगेचच संपर्क साधून रक्त देण्याची तयार दाखवली. पण डॉक्टरांनी सूचना दिली की उपाशी पोटी रक्त देता येणार नाही.

स्रोत

याचाच अर्थ रोजा तोडावा लागणार. आरिफ खान यांनी मागचा पुढचा विचार न करता रक्त देण्यासाठी आपला रोजा तोडला. मंडळी, त्यांच्या या कृतीची प्रशंसा झाली नसती तरच नवल.

आरिफ खान यावर म्हणाले, “जर कोणाचा जीव वाचवण्यासाठी मला रोजा तोडावा लागत असेल तर मी नक्की तसं करेन.”

 

आणखी वाचा :

मुसलमानाने बांधलेले शिवमंदिर - श्री कुणकेश्वर !!

सबस्क्राईब करा

* indicates required