computer

मुंबईकरांनो मुंबईतले हे ८ महत्वाचे पूल बंद होणार आहेत माहित्ये का ??

रस्त्यावरचे खड्डे आणि मेट्रोने खोदून ठेवलेले रोड यांच्यातून वाट काढत मुंबईकर रोज प्रवास करत असतो. याला मुंबईकरांची फार जुनी adjust होण्याची परंपरा म्हणतात. आता हे कमीच होतं की काय म्हणून मुंबईकरांना आणखी थोडं adjust करावं लागेल. मुंबईतले ८ महत्वाचे पूल बंद होणार आहेत. याचा अर्थ काय ? मुंबईकर ‘ना घर का, ना घाट का’ !!

गेल्यावर्षी अंधेरीचा गोखले ब्रिज कोसळला. त्यापूर्वी एल्फिन्स्टन पूल दुर्घटना घडली. असे अपघात घडल्यावरच आपल्याला जाग येते. मग मुंबईतल्या जवळपास ४४५ पुलांची तपासणी करण्यात आली. तपासणीत असं आढळलं की तब्बल ६१ पुलांना तातडीने दुरुस्तीची गरज आहे तर १८ पुलांना नव्याने बांधण्याची गरज आहे. पैकी ८ पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या ८ पैकी ५ पूल हे रेल्वे पूल आहेत तर उरलेले पादचारी पूल आहेत. चला तर हे पूल कुठे आहेत ते पाहूया !!

१. महालक्ष्मी स्टेशनचा १०० वर्ष जुना रेल्वे ब्रिज.

२. लालबाग, लोवर परेल आणि हिंदमाताला जोडणारा करी रोड स्टेशन ब्रिज.

३. सायन स्टेशन रेल्वे ब्रिज.

४. सायन हॉस्पिटल, धारावीचा रेल्वे ब्रिज.

५. मुंबईच्या सर्वात जुन्या रेल्वे पुलांपैकी एक असलेला दादरचा टिळक पूल.

६. दादरच्या फुल बाजारातील पादचारी पूल.  

७. माहीम लेव्हल क्रॉसिंग ब्रिज.

८. धारावीच्या नाल्यालगत असलेला दादरचा ब्रिज.

(प्रातिनिधिक फोटो)

मंडळी, हे सगळे पूल नेहमीच्या वापरातले आहेत. दादरचा फुल बाजार भागातला पूल तर नेहमीच गर्दीने भरलेला असतो. करी रोडच्या रेल्वे पुलावरच करी रोड स्टेशन बांधण्यात आलं आहे. धारावीच्या नाल्याजवळून जाणाऱ्या पुलाशेजारी कितीही घाण असली तरी मुंबईकर नाक बंद करून रोज प्रवास करतात.

मंडळी, खोदलेले रस्ते, रस्त्यावरचे खड्डे आणि आता हवेत बांधलेले पूल पण नाहीत. रस्ते पुन्हा सुरळीत होण्याची किंवा नवीन पूल बांधून पूर्ण होण्याची वाट बघण्याखेरीज मुंबईकरांकडे पर्याय नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required