थट्टा नाही राव...गुजरातमधली हे कुत्रे चक्क कोट्याधीश आहेत !!

तुम्ही हिंदी सिनेमात एक डायलॉग ऐकला असेलच “हर कुत्ते के दिन आते है...”. हा डायलॉग गुजरात मध्ये खरा ठरला आहे राव. मेहसाणा जिल्ह्यातील पंचोत गावात असलेले ७० कुत्रे कोट्याधीश झाले आहेत. चला हा प्रकार काय आहे ते समजून घेऊ....

मेहसाणा भागातील पंचोत गावात जवळजवळ ८० वर्षापूर्वी जमीन कुत्र्यांच्या नावे करण्यात आली होती. तिथल्या कुत्र्यांच्या देख्भालीतून ‘मध नी पती कुतरिया’  ही संस्था तयार झाली. या संस्थेची २१ एकर जमीन ही कुत्र्यांच्या नावे आहे. आता झालं असं की, मेहसाणा बायपासचं काम चालू असल्यामुळे या भागातील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्याप्रमाणे जमिनीची किंमत प्रती एकर 3.5 कोटी रुपये झाली आहे. याचाच अर्थ २१ एकर जमिनीची किंमत तब्बल ७० कोटी एवढी झाली आहे. आता जमीन कुत्र्यांच्या नावे असल्याने तिथली ७० कुत्रे १ कोटीचे मालक झालेत.

स्रोत

८० वर्षापूर्वी एका श्रीमंत कुटुंबाने दान म्हणून ही जमीन कुत्र्यांच्या देखभालीसाठी दिली होती. प्रत्येक वर्षी या जमिनीचा लिलाव होऊन जो जास्त बोली लावेल त्याला ही जमीन कसायला दिली जाते. जमिनीतून येणारं उत्पन्न कुत्र्यांना सांभाळण्यासाठी खर्च केला जातो.

एकंदरीत गावात खऱ्या अर्थाने ‘भूतदया’ नांदत आहे असं आपण म्हणू शकतो. यातूनच भारतातील सर्वात श्रीमंत कुत्र्यांमध्ये या गावातील कुत्र्यांचा समावेश झाला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required