हत्तींच्या कळपासमोर चिमुरडी पडली, हत्तीने त्यावर काय केले पाहा...

मंडळी, पश्चिम बंगाल मधल्या एका घटनेत चक्क एका हत्तीने लहानग्या मुलीला आपल्या पायांमध्ये संरक्षण दिलं आहे. खरं तर या भागातील हत्ती पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी बदनाम आहेत. पण या घटनेत अगदी उलट पाहायला मिळालं. चला तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं ते.

त्याचं झालं असं, की गोरुमारा राष्ट्रीय उद्यानातून नीतू घोष, त्यांची पत्नी आणि मुलगी आहाना स्कूटरवरून प्रवास करत होते. जंगलाचा हा भाग झाडींनी वेढलेला होता. रस्त्यामुळे जंगलाचे दोन भाग झाले होते.

गोरुमारा राष्ट्रीय उद्यान (स्रोत)

जंगलाच्या एका भागात आल्यावर नीतू गोष यांनी बघितलं की हत्तींचा एक कळप रस्ता ओलांडत आहे. त्यांनी गाडी थांबवली. कळप निघून गेल्यावर ते पुढे निघाले, पण हत्तींच्या कळपातील काहीजणांनी अजून रस्ता ओलांडला नव्हता. स्कूटर पुढे निघाल्यानंतर अचानक समोर हत्ती आल्याने स्कूटर जवळजवळ हत्तींवर आदळली. तिघेही स्कूटरवरून पडले.

यावेळी एक विचित्र गोष्ट घडली. हत्तींच्या कळपातील एक हत्ती पुढे आला आणि त्याने ४ वर्षांच्या आहानाला आपल्या पायांमध्ये संरक्षण दिलं. बाकीचे हत्ती निघून जाईपर्यंत तो तिथेच उभा होता. सगळा कळप निघून गेल्यावर तो हत्तीही निघून गेला.

प्रातिनिधिक फोटो (स्रोत)

अशा प्रकारे या विचित्र प्रसंगात लहानग्या आहानाचा जीव वाचला. तिला अपघातामुळे जखमा झाल्या होत्या. तिला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं. हत्तींमुळे तिला कोणतीही इजा पोहोचली नव्हती हे विशेष.

मंडळी, हा प्रसंग चमत्कारीक म्हणता येईल.  कारण नुकतीच एका पर्यटकाला हत्तींनी मारल्याची घटना घडली होती. तसेच काही पर्यटक जखमी पण झाले होते. अशा गोष्टी घडत असताना दुसऱ्या बाजूला या घटनेत हत्तीने एक वेगळं उदाहरण घालून दिलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required