पंतजलीच्या सिमकार्डमध्ये आपल्याला काय काय मिळू शकतं? जरा अंदाज लावूया...

भारत वर्षात राहणार्‍या समस्त भारतीयांसाठी रामदेव बाबांनी विदेशी ब्रॅण्ड्सना टक्कर देत हरएक प्रकारची स्वदेशी उत्पादनं बाजारात आणलीयेत. आता तर त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी स्वदेशी सिमकार्ड आणि व्हाट्सअॅपशी स्पर्धा करण्यासाठी 'किम्भो' अॅपही लॉन्च केलंय. आता रामदेवबाबांनी हे संस्कारी सिमकार्ड जर सर्वांसाठी बाजारात आणलं, तर त्यात आपल्याला काय काय सुविधा मिळू शकतील बुवा? जरा कल्पना करून बघुया...

पंतजली सिममध्ये नेटवर्क हे टॉवर्सऐवजी पिंपळ वृक्षापासुन येऊ शकतं. ते नेटवर्कही सुर्योदयासोबत येईल आणि सुर्यास्तानंतर जाईल!

स्त्रोत

कॉलरट्युन कोणतीही सेट करा... ऐकायला फक्त गायत्री मंत्रच येणार!

पंतजलीच्या कस्टमर केअरला फोन लावला तर इंग्लिशसाठी एक, हिंदीसाठी दोन, आणि संस्कृतसाठी तीन दाबावं लागेल!

स्त्रोत

पंतजली सिमवर ज्या दोन नंबर्सवर तुम्हाला फ्री कॉलींग मिळेल ते नंबर तुमच्या आई-वडिलांचेच असावेत. प्रियकर-प्रेयसीच्या नंबरसाठी तुम्हाला डबल कॉल रेट पडू शकतो!

या सिमवरून म्हणा किंवा 'किम्भो' अॅपवरून म्हणा, तुम्हाला कोणतेही अश्लील संदेश पाठवता येणार नाहीत. पाठवायचा प्रयत्न केला तरी ते सेन्डच होणार नाहीत!

तुम्हाला काय वाटतं? अजून काय काय असू शकतं या पंतजली सिममध्ये? तुमच्या गंमतीदार कल्पना कमेन्ट बॉक्समध्ये नक्की सांगा....

स्त्रोत - The Lallantop

सबस्क्राईब करा

* indicates required