computer

गुगलने एका फोनच्या बदल्यात पाठवले १० फोन ? काय आहे हा गोंधळ ??

महागडी वस्तू खरेदी करताना आपण एक प्रश्न हमखास विचारतो – “गॅरेंटी आहे का ?”. गॅरेंटी असलेली वस्तू जर खराब निघाली तर आपल्याला नवीन कोरी वस्तू मिळते. कधी ऐकलं आहे का ? खराब वस्तूच्या बदल्यात कंपनीने त्याच किमतीच्या तब्बल १० वस्तू दिल्या आहेत ? कंपनी सहजासहजी असा वेडेपणा करणार नाही.

राव, खरं तर चक्क गुगलनेच हा वेडेपणा केलाय. रेडीटवर Cheetohz नावाच्या युझरने त्याच्यासोबत नुकताच घडलेला एक किस्सा सांगितला आहे. त्याने गुगलचा Pixel 3 फोन घेतला होता. हा फोन खराब निघाला. त्याने गुगलला फोन बदलून द्यायला सांगितल्यावर त्याला बदल्यात तब्बल ९००० डॉलर्सचे म्हणजे ६,२४,५१० रुपयांचे १० Pixel 3 फोन पाठवण्यात आले.

त्यापूर्वी गुगलने जुन्या फोनवरचा कर म्हणून ८० डॉलर्स (५,५५१ रुपये) परत दिले होते. इथेच खरी गम्मत आहे. Cheetohz ने उरलेले ९०० डॉलर्स परत न घेता एका वेगळ्या खरेदीत नवीन Pink Pixel 3 फोन मागवला, पण गुगलला वाटलं की त्याने १० Pink Pixel 3 फोन मागवले आहेत. या चुकीच्या माहितीमुळे सगळा घोळ झाला.  

गुगलने रेडीट अकाऊन्टवरून Cheetohz शी संपर्क साधलेला आहे आणि झालेला गोंधळ निस्तरायच्या प्रयत्नात आहे. Cheetohz हे सगळ्यांसमोर सांगून १० फोन गमावलेत राव.

 

मंडळी, गुगलच्या अशा चुकांमुळे कंपनीला  याआधी पण फटका बसला आहे. एका व्यक्तीने तर खोटे बिल पाठवून गुगलला लाखोंचा गंडा घातला होता. सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर जा.

गुगल आणि फेसबुकला तब्बल ८४४ कोटींचा चुना लावणारा ठग....कसा केला त्याने हा घोटाळा.

सबस्क्राईब करा

* indicates required