हिमालयात सापडणाऱ्या या किड्याची किंमत चक्क काही लाखांत का आहे?

मंडळी, हिमालय बर्फाच्छादित पर्वतराजीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. माउंट एव्हरेस्ट, कैलाश पर्वत, मानसरोवर अशा स्थळांनी हिमालय लोकांना आकर्षित करत असतो. पण माहित आहे का राव, हिमालयात आणखी एक गोष्ट आहे जी जगभरातल्या लोकांना आकर्षित करते. या एका गोष्टीसाठी लोक लाखो रुपये खर्च करायला त्या असतात. ही गोष्ट आहे एक किडा.

मंडळी, तुम्ही बरोबर वाचलंत. हिमालयात ‘यार्सागुम्बा’ नावाचा किडा आढळतो ज्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. या किड्याची किंमत चक्क ६० लाखपर्यंत असते. हा किडा दुर्मिळ असल्याने त्याची इतकी मोठी किंमत मोजावी लागते. हिमालयाच्या पर्वतराजीत अनेक दिवस शोध घेतल्यानंतर तो एकदाचा कधीतरी सापडतो. यासाठी अनेकजण दिवसरात्र राबत असतात.

(पाह्यलंत, किती लोकांना हा किडा शोधण्याचा किडा चावतो ते?- स्रोत)

‘यासार्गुम्बा’ किड्याचं अर्धं शरीर एखाद्या लहानशा रोपट्यासारखं दिसतं.  या किड्याला इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी असण्याचं कारण म्हणजे या किड्यापासून एक खास औषध तयार केलं जातं. या औषधाचा उपयोग ‘व्हायाग्रा’ सारखा केला जातो. त्यामुळे या औषधाला देखील  ‘हिमालयन व्हायाग्रा’ म्हटलं जातं.

मंडळी, या किड्याची खासियत म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.  पण हृदय विकार असलेल्या व्यक्तीला हे घातक ठरू शकतं.

सबस्क्राईब करा

* indicates required