computer

या ४ प्रकारे देशांना नावे दिली जातात...पहा बरं भारत कोणत्या प्रकारात मोडतो !!

स्वतःच्या देशाच्या नावाबद्दल प्रत्येकालाच अभिमान वाटत असतो. तुम्हा आम्हालाही तो अभिमान वाटतोच. आता मला एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. देशाची नावे कशी ठेवली जातात राव ? देश त्याच्या नावाने ओळखला जातो पण हे नाव नक्की कशावरून येतं ?

माहित नसेल तर आम्हीच सांगतो राव. जगातील देशांची नावे ४ वर्गात विभागली जातात. ते चार विभाग कोणते आहे ते बघुयात.  

१. जमिनीचं वैशिष्ट्य

जगात जेवढे देश आहेत त्याच्या एक चतुर्थांश देशांची नावे तिथल्या जमिनीच्या वैशिष्ट्यावरून तयार आलेली आहेत. आता सिंगापूरचच उदाहरण घ्या. सिंगापूर या नावाचा अर्थ ‘सिंहाचा देश’ असा होतो. दुसरं उदाहरण बघा, ग्रेनेडा देशाचं नाव स्पेन मधल्या ग्रानाडा या शहराच्या नावावरून तयार झालं. ग्रेनेडा ला गेलेल्या काही प्रवाश्यांना तिथला भूभाग ग्रानाडाची आठवण करून देत होता.

२. विशिष्ट दिशेला असलेला भूभाग

ऑस्ट्रेलिया देशाचं उदाहरण घेऊया. ऑस्ट्रेलिया हे नाव ग्रीक शब्दावरून तयार झालेलं आहे ज्याचा अर्थ होतो ‘दक्षिणेचा अज्ञात प्रदेश’. आयर्लंड नावाचा अर्थ होतो पूर्वेचा प्रदेश. हे तर खूपच लांबचं झालं आपल्याच देशाच बघा. India हे नाव indus म्हणजे सिंधू नदीवरून तयार झालेलं आहे. म्हणजेच सिंधू नदीच्या काठावरील प्रदेश.

३. जमातीचं नाव

एका अभ्यासानुसार एक तृतीयांश देशांची नावे ही तिथल्या जमातींच्या नावावरून तयार झालेली आहेत. आपल्या शेजारच्या बांगलादेशचं उदाहरण घ्या. बांगला लोकांचा प्रदेश म्हणून बांगलादेश. सौदी अरेबिया मधील अरेबिया हे नाव सुद्धा अरब टोळ्यांचा भूप्रदेश याअर्थी तयार झालेलं आहे.

४. व्यक्तीचं नाव

एखाद्या व्यक्तीच्या नावावरून देशाला नाव मिळाल्याची अनेक उदाहरणं देता येतील. अमेरिका हे नाव इटालियन खलाशी ‘अमेरिगो वेस्पुसी’च्या नावावरून तयार झालेलं आहे. आपल्या देशाचं भारत नाव हे सुद्धा ‘भरत’ राजाच्या नावावरून तयार झालेला आहे.

काही अपवाद :

काही देशांची नावे या चारही वर्गात मोडत नाहीत. अशी काही उदाहरणं देता येतील. ‘माल्टा’ देशाचं उदाहरण बघा. माल्टाचा अर्थ होतो ‘आश्रय’ किंवा ‘मधमाशी’. आपल्या शेजारचं उदाहरण बघा, नेपाळचा अर्थ होतो ‘एक नवीन युगाची सुरुवात’, ‘पवित्र स्थान’, किंवा ‘केंद्रस्थानी असलेला देश’. नेपाळ देशाचा असा एकच अर्थ होत नाही.

 

मंडळी देशाच्या नावातून तिथल्या लोकांची, संस्कृतीची, भू प्रदेशाची ओळख पटत असते. जगातील प्रत्येक देशाचं नाव याच पद्धतीने तयार झालेलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required